Breaking News

कोराडी औष्णिक विद्युत केंद्रात जागतिक आदिवासी दिन साजरा

Advertisements

नागपूर : कोराडी आदिवासी समाज सेवा समिती व राणी दुर्गावती आदिवासी महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने औष्णिक विद्युत केंद्र कोराडीच्या विद्युत विहार वसाहत येथील प्रशस्त क्लब न. 2 येथे मोठ्या उत्साहात पार पडला. आदिवासी समाजाच योगदान आणि त्यांच्या मुलभूत समस्या यावर आयोजित प्रबोधनात्मक व्याख्यानमा आयोजित करण्यात आली.सदर व्याख्यानमालेचे उद्घाटन विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता मा.विजय राठोड यांच्या हस्ते,विद्युत केंद्राचे उपमुख्य अभियंता मा.राहुल सोहनी, आणि मा.शैलेंद्र कासुलकर यांच्या उपस्थितीत पार पडले. प्रबोधनात्मक व्याख्यानमालेचे अध्यक्ष मा.प्रवीण मडावी, कार्यकारी अभियंता,तर व्याख्यानमालेत वक्ते म्हणून डॉ. पुरुषोत्तम मडावी, संचालक – राज्य आरोग्य व कुटुंब कल्याण संस्था नागपूर, मा.राधेश्याम उईके वरिष्ठ व्यवस्थापक वित्त आ लेख विभाग कोराडी, मा.प्रकाश सलामे ज्येष्ठ आदिवासी साहित्यिक गोंडी लिपी व भाषा तज्ञ, मा.अजिजखान पठाण सहाय्यक अभियंता कोराडी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी समाजातील गुणवंत विद्यार्थी,महिला पुरुष यांचा सत्कार करण्यात आला.
व्याख्यानमालेत मा सुधाकर खंडाते कार्यकारी अभियंता, मा.अभिजित दाबेराव , अति कार्य.अभियंता, मा. अख्तर तडवी, उप.कार्य. अभियंता आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवात उपस्थित मान्यवारांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून करण्यात आली.कार्यक्रमाचे उदघाटक मा. विजय राठोड यांनी आदिवासी समाज एकनिष्ठ, प्रामाणिक असल्याचे प्रतिपादन केले.या वेळी उपमुख्य अभियंते राहुल सोहनी,शैलेंद्र कासुलकर,अभिजित दाबेराव,सुधाकर खंडाते, यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आदिवासी समाज सेवा समिती चे सचिव, सुभाष घासले, संचालन राणी दुर्गावती आदिवासी महिला मंडळाच्या शिल्पा मिथुन कोडापे, अनिता रुपलाल आत्राम यांनी केले.तर शेवटी आदिवासी समाज सेवा समिती अध्यक्ष गोविंद पट्ठे यांनी कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थित मान्यवारांचे व समाज बांधवांचे आभार मानले.

Advertisements

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आ. स. से समिती पदाधिकारी व कार्यकर्ता निलेश वरखडे, मिथुन कोडापे, कैलाश उईके, संजय आत्राम, रविंद्र आत्राम, विजेंद्र मडावी, गजानन मडावी, महादेव आडे,सुनिल पराशे,संपत धुर्वे, नंदूलाल धुर्वे, ओमप्रकाश मडावी,नंदकिशोर उईके, राहून इवनाते भोजराज जुमनाके, नरेश कुमरे, राजेश मेश्राम. राणी दुर्गावती आदिवासी महिला मंडळाच्या मंजुषा सयाम, संगीता पट्ठे, सरिता आत्राम,निशा आडे, स्मिता वरकडे, कुंदा उईके, रंजना धुर्वे, सोनम उईके, लुषा घासले, रितू आत्राम,नूतन पराशे, कु. श्रेया भलावी, व ऊर्जाक्रांती क्लब पदाधिकारी, सभासद आदिनी सहकार्य केले.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

नकली MARC बेयरिंग्स के उपयोग से खापरखेडा बिजली संयंत्र का उत्पादन ठप्प

नकली MARC बेयरिंग्स के उपयोग से खापरखेडा बिजली संयंत्र का उत्पादन ठप्प नागपुर। महाराष्ट्र राज्य …

अनुबंध श्रमिकों को न्याय दिलाने पर श्रमायुक्त का आभार अभिनंदन

अनुबंध श्रमिकों को न्याय दिलाने पर श्रमायुक्त का आभार अभिनंदन   टेकचंद्र शास्त्री: 9822550220   …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *