Breaking News

प्रफुल्ल पटेल NCP प्रमुख शरद पवारांसाठी आले धावून

Advertisements

राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांची भंडाऱ्यात सभा होणार आहे. अजितदादा गटाचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या बालेकिल्ल्यात ही सभा होत आहे. या सभेची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, शरद पवार यांच्या इतर सभांप्रमाणेच ही सभा मोठी होणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यापूर्वीच प्रफुल्ल पटेल यांनी मोठा दावा केला आहे. शरद पवार यांच्या सभेला गर्दी करण्याच्या सूचना प्रफुल्ल पटेल यांनी त्यांच्या समर्थकांना दिल्या आहेत. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. राष्ट्रवादीत पडद्यामागं नेमकं काय सुरू आहे? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे.

Advertisements

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट निर्माण झाल्यानंतर प्रफुल्ल पटेल हे पहिल्यांदाच भंडारा जिल्ह्यात पोहोचले. यावेळी त्यांच्या जंगी सत्काराचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. यादरम्यान उपस्थित कार्यकर्त्यांना त्यांनी मार्गदर्शन केले. या मार्गदर्शनाच्या वेळी त्यांनी शरद पवारांना टोला लगावला आणि विविध विषयांना हात घालत शेवटी शरद पवारांची जर सभा झाली तर, त्या सभेला गर्दी झाली पाहिजे म्हणून सर्व कार्यकर्त्यांनी सभेला आवर्जून जावे अशाही सूचना यावेळी त्यांनी केल्या आहेत. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

अजित पवारांचा मारेकरी सापडला : मोठी बातमी

अजित पवार यांच्या अपघाताबाबत वारंवार शंका उपस्थित केल्या जात आहेत. आमदार रोहित पवार आणि राष्ट्रवादी …

विधानसभा चुनाव फर्जी मतदान का पर्दाफास : 25 विदेशी गिरफ्तार

विधानसभा चुनाव फर्जी मतदान का पर्दाफास : 25 विदेशी गिरफ्तार टेकचंद्र शास्त्री: 9822550220   चेन्नई। …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *