फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्याच आठवड्यात देशातील अनेक भागांमधून थंडी गायब झाली असून उन्हाच्या झळा बसण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील अनेक भागातून थंडी गायब झाली आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरण तयार होत असून अवकाळी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
पुढील काही दिवसांत विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस आणि गारपीट होऊ शकते, असे भारतीय हवामान खात्याने सांगितले आहे. देशातील काही भागात पुढील तीन ते चार दिवस अवकाळी पावसाचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे. जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस आणि हिमवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर पंजाब, हरियाणा आणि दिल्लीमध्ये आजपासून पुढील तीन दिवस अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.