Breaking News

अभिनेत्री रेखाच्या मुलीला ओळखता का?

Advertisements

बॉलिवूडच्या एव्हर ग्रीन अभिनेत्री रेखा यांनी अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आजही चाहते रेखा यांचे सिनेमे तितक्याच आवडीने आणि आनंदाने पाहतात. रेखा आज बॉलिवूडमध्ये सक्रिय नसल्याा तरी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे असतात चर्चेत. आता देखील रेखा यांच्याबद्दल मोठी चर्चा रंगली आहे. रेखा यांना बॉलिवूडची प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री दुसरी आई म्हणते. रेखा यांना आपली दुसरी आई म्हणणारी अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नाही तर, अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आहे.

Advertisements

 

सांगायचं झालं तर, सोनाक्षी सिन्हा हिचं ‘हीरामंडी’ सीरिजमधील काम पाहिल्यानंतर रेखा यांनी सोनाक्षी हिचं कौतुक केलं. ‘हीरामंडी’ सीरिज पाहिल्यानंतर रेखा यांनी सोनाक्षी हिला स्वतःची मुलगी म्हटलं आहे. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत सोनाक्षी हिने यावर मोठा खुलासा केला.

Advertisements

 

सोनाक्षी म्हणाली, ‘याबद्दल विचार करते तेव्हा मी स्वतः हैराण होते. प्रचंड रंजक करणारी गोष्ट आहे. रेखा यांनी माझ्या आईला म्हटले, मी सोनाक्षी हिची दुसरी आई आहे. सोनाक्षी माझी मुलगी आहे. त्या माझ्यावर स्वतःच्या मुलीप्रमाणे प्रेम करतात.’ असं देखील सोनाक्षी म्हणाली.

सांगायचं झालं तर, सिन्हा कुटुंबासोबत रेखा यांचे खास संबंध आहेत. शत्रुघ्न सिन्हा यांच्या पत्नी पूनम यांच्यासोबत रेखा यांचे खास नातं आहे. सोनाक्षी सिन्हा हिचे वडील आणि दिग्गज अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी रेखा यांच्यासोबत अनेक सिनेमांमध्ये काम केलं. पण एक काळ असा आला जेव्हा शत्रुघ्न सिन्हा आणि रेखा यांच्यातील वाद टोकाला पोहोचले. ‘खून भरी मांग’ सिनेमाच्या शुटिंग दरम्यान शत्रुघ्न सिन्हा आणि रेखा यांच्यामध्ये काही मतभेद झाले होते. याबद्दल शत्रुघ्न सिन्हा यांनी सत्य सांगत पत्नीमुळे पुन्हा रेखा यांच्यासोबत असलेली मैत्री पुन्हा घट्ट झाली. असं देखील शत्रुघ्न सिन्हा म्हणाले होते

 

रिपोर्टनुसार, ‘खून भरी मांग’ सिनेमाच्या शुटिंग दरम्यान झालेल्या मतभेदानंतर शत्रुघ्न सिन्हा आणि रेखा जवळपास 20 वर्ष एकमेकांसोबत बोलत नव्हते… एक काळ असा होता, जेव्हा शत्रुघ्न सिन्हा आणि रेखा यांनी चाहत्यांच्या मनावर आणि बॉलिवूडवर राज्य केलं होतं. आता दोघे अभिनयापासून दूर असले तरी कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

Tateeree गाने पर मचे बवाल पर आया बादशाह का रिएक्शन

Tateeree गाने पर मचे बवाल पर आया बादशाह का रिएक्शन टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   …

Thalapathy Vijay, Trisha Krishnan attend wedding together amid affair allegation by actor’s wife

Actor Thalapathy Vijay attended a wedding in Chennai with actress Trisha Krishnan on Thursday, days …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *