Breaking News

महादुला संघर्ष समितीच्या प्रयत्नांनी वीस लक्ष लिटर पाणी: चंद्रशेखर बावनकुळे

Advertisements

महादुला संघर्ष समितीच्या प्रयत्नांनी वीस लक्ष लिटर पाणी: चंद्रशेखर बावनकुळे

Advertisements

 

टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट

Advertisements

 

नागपुर जिल्हाचे महादुला- कोराडी येथील दिनांक 04/08/2024 रोजी महाराष्ट्र राज्याचे विधान परिषद आमदार तसेच माजी ऊर्जा उत्पादन शुल्क व पालकमंत्री नागपूर मा चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या हस्ते महानिर्मिती मार्फत महादुला नगरवासीयांना प्रतिदिन 20 लक्ष लिटर पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी प्रस्थापित करण्याच्या कामाचे कार्यारंभ करण्यात आले.

 

महानिर्मिती कंपनीच्या कोराडी औष्णिक विद्युत केंद्र प्रकल्पामुळे महादुला नगरवासीयांचे पिण्याच्या पाण्याचे सर्व स्त्रोत प्रभावित झाले होते. त्यावर महादुला शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण च्या आवाढव्य बिलांचे त्रास महादुला नगरवासीयांना होता. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा या हेतूने महादूला नगरवासीयांच्या हितार्थ महादुला संघर्ष समितीमार्फत साल 2022 मध्ये महानिर्मिती कंपनी, शासन-प्रशासन व महादुला नगरपंचायत यांना वारंवार पत्र व्यवहार करून देखील समस्या न सुटल्यामुळे दि.02/11/2022 पासून धरणे साखळी उपोषण तसेच 06/11/2024 पासून अन्नजल त्याग करित आमरण उपोषण केले गेले होते. सदर विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन मा.आ.चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी समस्या सोडवण्याच्या उद्देशातून अनंत प्रयत्न केले. ज्या प्रयत्नांना 21/06/2024 रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री मा.ना. देवेंद्रजी फडणवीस यांच्या सहकार्याने महानिर्मिती कंपनीच्या मुंबई येथील मुख्यालयात मुख्य संचालक अन्लबम यांच्या उपस्थितीत सामाजिक बांधिलकी धोरण निधीतून को. औ. वि.कें. जलशुद्धीकरण प्रकल्प ते महादुला येथील जलशुद्धीकरण संयंत्रापर्यंत नवीन पाईपलाईन प्रस्थापित करून महादुला शहरवासीयांना प्रतिदिन 20 लक्ष लिटर पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनी च्या कामाची मंजुरी घेतली.

सदर जलवाहिनी प्रस्थापित करण्याच्या कामाचे आज दि.04/08/2024 रोजी मा.आ.चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या शुभहस्ते कार्यारंभ करण्यात आले. या समस्ये करिता गेली २ वर्ष सतत लढा देणाऱ्या महादुला संघर्ष समितीच्या वतीने कार्यारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते

या कार्यक्रमात प्रामुख्याने मा.आ.चंद्रशेखरजी बावनकुळे मा.आ.टेकचंदजी सावरकर (कामठी विधानसभा), मा माजी आ.सुधाकरजी कोहळे, माजी जि.प.सदस्य अनिलजी निधान, जयस्वालजी को.औ.वि.कें. च्या वतीने विलासजी मोटघरे (मुख्य अभियंता), विवेक जी रोकडे (मुख्य अभियंता, प्रकल्प), गजलवार साहेब (उपमुख्य अभियंता, प्रकल्प), शिरिशजी वाट (उपमुख्य अभियंता), म.जी.प्रा. महादुला च्या वतीने प्रशांतजी गुरव (मुख्य अभियंता), निशिकांतजी ठोंबरे (उपमुख्य अभियंता) महादुला न.पं. च्या वतीने मुख्याधिकारी व नायब तहसीलदार अमरजी हांडा, राजेशजी रंगारी (माजी नगराध्यक्ष), धनंजयजी भालेराव (माजी उपनगराध्यक्ष), माजी नगरसेवक स्वप्निलजी धोटे,अर्चनाताई मंडपे, महेशजी धुळस, गुणवंताताई पटले, मोहसीनजी शेख, सोनूताई कांबळे, तिलकजी गजभिये, विजयजी राऊत, नरेंद्रजी झोड, सविताताई वानखेडे, मंगेशजी देशमुख, संगीताताई वरठी, अर्चनाताई वानखेडे, पंकजजी ढोणे, सविताताई ढेंगे, पवनजी पाखिद्दे, कांचनताई कुथे. महादुला संघर्ष समितीच्या आंदोलनादरम्यान सहकार्य करणारे समीरजी सोनारे (शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस पक्षाचे वतीने प्रशांतजी मेश्राम, शैलेशजी गजघाटे, अनिलजी बोरकर वंचित बहुजन आघाडीचे वतीने विशालजी सोनवणे, शेंद्रेजी, टीयूसीसी चे संजयजी कटकमवार, कोराडी ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच पन्नालालजी रंगारी, कंत्राटदार राजूजी लोणारे, बाजार चौक महिला मंडळ, धम्मकुटी महिला मंडळ, महामाया महिला मंडळ, बेरोजगार युवा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने, सुरेशजी घोडमारे, सोनूताई काळे भूमिपुत्र बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने प्रशांतजी रेवतकर, बहुजन ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने भानुदास पाटील, श्री.छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती, क्रांतीसुर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर समिती, भीम पॅंथर संघटनेच्या वतीने मंगलजी सुरडकर, वरिष्ठ पत्रकार टेकचंदजी सानोडिया, दिनकरजी ठवरे, दिनेशजी तोडवाल, राजकुमारजी शाहू, सुनीलजी साळवे, शैलेशजी ढोरे, भाजपा महादूलाच्या वतीने प्रीतमजी लोहसारवा, जितेशजी भगत, राष्ट्रगनजी चंद्रशेखर प्रामुख्याने उपस्थित होते.

सदर प्रकल्पाकरिता अहोरात्र मेहनत करणाऱ्या महादुला संघर्ष समितीच्या वतीने, सुधीरजी धुरिया, आकाशजी उके, पौर्णिमाताई भिलावे, पंकजजी सोर, ममताताई ढोके, सुरेंद्रजी निकोसे, विक्कीजी खिल्लारे, शारदाताई मेश्राम, संदीपजी मेश्राम, मंगेशजी भा. भिलावे, अनिताताई शाहू, सचिनजी वानखेडे, विशालजी सोनवणे, कैलासजी खेरगडे, विजयजी जैन, सुनीलजी बारस्कर, विलासजी कानोजे, संतोषजी भोंगाडे, विजयजी बोरकर, बापूजी भागवतकर, अजयजी विटकर, दीपकजी शाहू, श्यामजी भेंडे, संतोषजी शाहू, शेषरावजी हावरे, राहुलजी बागडे, सलीमजी कुरेशी यांनी या संपूर्ण कार्यक्रमाकरिता महादूला नगरवासीयांच्या वतीने आयोजन केले होते.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

विधानसभा चुनाव फर्जी मतदान का पर्दाफास : 25 विदेशी गिरफ्तार

विधानसभा चुनाव फर्जी मतदान का पर्दाफास : 25 विदेशी गिरफ्तार टेकचंद्र शास्त्री: 9822550220   चेन्नई। …

सुनेत्रा पवार यांचं उपमुख्यमंत्री पद धोक्यात!

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमान अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अत्यंत नाट्यमय घडामोडी घडत आहेत. निवडणूक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *