Breaking News

माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार : संजय दत्त लीलावती रुग्णालयात

Advertisements

अजित पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्यावर शनिवारी रात्री गोळीबार करण्यात आला आहे. निर्मल नगर परिसरातील झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर हा हल्ला झाल्याची माहिती आहे. हल्लेखोरांनी बाबा सिद्दीकी यांच्यावर दोन ते तीन राऊंड फायर केल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, बाबा सिद्दीकी यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.

Advertisements

बाबा सिद्दीकी यांच्या छातीला गोळी लागली आहेत. याशिवाय त्यांच्या सहकाऱ्याच्या पायालाही गोळी लागली आहे. आज रात्री ९ वाजताच्या सुमारास हा हल्ला झाला आहे. दरम्यान, या हल्ल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे ( अजित पवार गट) नेते रुग्णालयात दाखल होत आहेत. अभिनेता संजय दत्तदेखील रुग्णालयात दाखल झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांना फोन करून माहिती घेतली आहे. सिद्दीकी यांचा गोळीबारात मृत्यू झाल्याची माहिती आहे.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

जंगली जानवरों के आतंक से सिवनी जिले किसान बेहद परेशान

जंगली जानवरों के आतंक से सिवनी जिले किसान बेहद परेशान टेकचंद्र सनोडिया शास्त्री: संयुक्त संपादक …

महाराष्ट्रात नवीन जमीन घोटाळा : वाचा

मल्टी-कोटी ‘लँड जिहाद’ उघड वकिलांनी बळकावलेल्या मालमत्ता परत मिळवून प्रशासनातील त्रुटी उघड केल्या मुंबई: भुसावळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *