Breaking News

नागपुरच्या उमरेडमध्ये तरुणीचा बलात्कार करुन खून

नागपूर जिल्ह्यातील उमरेडमध्ये एक तरुणीवर प्रियकराने बलात्कार करुन तिचा खून केला .तरुणीचा मृतदेह आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली असून या प्रकरणी उमरेड पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध बलात्कार आणि खुनाचा गुन्हा दाखल केला. पूजा (२२, रा. उमरेड) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. लोकेश जुगनाके (३०, रा. अड्याळ) असे आरोपी युवकाचे नाव आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूजा ही उमरेडमध्ये बीएसडब्ल्यू पदवीच्या द्वितीय वर्षाला शिकत होती. तिचे इंस्टाग्रामवरुन लोकेश जुगनाके या युवकाशी सूत जुळले. लोकेश हा मोठमोठ्या हॉटेलमध्ये स्वयंपाकी (कूक) म्हणून काम करतो. दोघेही गेल्या दीड वर्षांपासून एकमेकांच्या संपर्कात होते. यादरम्यान, त्यांचे प्रेमसंबंध निर्माण झाले. दोघांच्या वेळोवेळी भेटी होत होत्या. पूजाला त्याने लग्नाचे आमिष दाखवले होते. नवीन वर्षात दोघेही लग्न करणार होते. त्यामुळे पूजा खूप खूश होती.

 

रविवारी लोकेशने तिला नेहमीप्रमाणे फिरायला जाण्यासाठी आग्रह केला. तिनेही होकार दिला. रविवारी सायंकाळी ते दोघेही एमआयडीसीकडे जाणाऱ्या महामार्गाने दुचाकीने फिरायला गेले होते. रात्र होताच पूजाने त्याला घरी सोडण्यास सांगितले. मात्र, लोकेशच्या मनात काहीतरी वेगळेच होते. त्याने महामार्गावरील एका बसस्टॉपवर नेले. तेथे तिला शारीरिक संबंधाची मागणी केली. मात्र, तिने नकार दिला. त्यामुळे लोकेशने तिच्याशी बळबजरी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या प्रकारामुळे पूजाला संताप आला. दोघांचा वाद झाला. रागाच्या भरात लोकेशने पूजाचा ओढनीने गळा आवळून खून केला. तिचा मृतदेह बसस्टॉपमध्येच फेकून त्याने पळ काढला. सोमवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी ठाणेदार धनाजी जळक यांनी हत्याकांड आणि बलात्काराचा गुन्हा दाखल केला. ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी घटनास्थळाला भेट दिली. फरार आरोपी लोकेशच्या शोधासाठी पथके तैनात करुन रवाना केले.

 

‘लोकेशने माझा रेप केला’

पूजाने शारीरिक संबंधास नकार देत घरी नेऊन मागितले होते. मात्र, लोकेशने तिच्यावर बलात्कार केला. त्यामुळे ती दुःखी झाली. ‘लोकेशने माझा रेप केला. त्याला शिक्षा झाली पाहिजे. त्याने माझा विश्वासघात केला. मी प्रेम केले पण त्याने माझ्यावर फक्त शारीरिक संबंधासाठी प्रेम केले.’ पूजाने हातावर पेनाने लिहून ठेवले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

About विश्व भारत

Check Also

नागपूर : रानडुकराने धडक दिल्याने दुचाकीस्वार ठार

रानडुकराने धडक दिल्याने दुचाकी अपघातात मोहन गोविंदराव लक्षणे (२२) या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना नागपूर …

शादी से पहले दूल्हे को मिले दुल्हन के अश्लील वीडियो

शादी से पहले दूल्हे के घर पहुंच गए दुल्हन के अश्लील वीडियो से मचा हड़कंप, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *