Breaking News

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर हल्ला : गंभीर जखमी

विधानसभा निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी नागपूर शहरासह जिल्ह्यातील सर्वच उमेदवारांनी मतदारसंघात जोरात प्रचार केला. अशातच काटोल मतदारसंघात शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर काही अज्ञातांनी दगडफेक करत त्यांना गंभीर जखमी केले.

 

माजी गृहमंत्री अनिल देशमुख निवडणूक लढवत नसून त्यांच्याजागी पुत्र नागपूर जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवत आहेत. निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने अनिल देशमुखांनी काटोल-नरखेडमध्ये जाऊन सालीलच्या विजयासाठी प्रचार केला. नरखेड येथील सभा घेऊन अनिल देशमुख हे काटोल येथे तीनखेडा-भिष्णुर मार्गाने परत येत होते. त्याचवेळी काटोल-जलालखेडा रोडवरील बेला फाट्याजवळ काही अज्ञातांनी त्यांच्या गाडीवर मोठ्या प्रमाणात दगडफेक केली. यात अनिल देशमुख हे गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचाराचा करिता नागपूरच्या रुग्णालयात हलवण्यात आले. देशमुख यांच्यावर हल्ला झाल्यानंतर मतदारसंघातील पक्षाचे कार्यकर्ते संतप्त झाले असून पोलीस प्रशासनाने हल्लेखोरांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

About विश्व भारत

Check Also

CM देवेंद्र फड़नवीस ने NCP चीफ शरद पवार से मांगा समर्थन

CM देवेंद्र फड़नवीस ने NCP चीफ शरद पवार से मांगा समर्थन टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक …

राष्ट्रीय स्वंयसेवक संघ दुनिया का सबसे बडा एनजीओ: PM मोदी का कथन

राष्ट्रीय स्वंयसेवक संघ दुनिया का सबसे बडा एनजीओ:PM मोदी का कथन   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *