Breaking News

आंघोळ विवस्त्र होऊन करत असाल तर…! : कारण जाणून घ्या

हिंदू धर्मात अनेक रिती नियम सांगण्यात आलंय. त्यासोबत प्रत्येक समाजाच्या आपल्या पंरपरा आणि प्रथा असतात. आपल्या दैनंदिन जीवनातील गोष्टींबद्दलही शास्त्रात काही नियम सांगण्यात आले आहे. त्यातील महत्त्वाचा नियम हा आंघोळबद्दलही सांगण्यात आलंय. घरातील जुनी आणि मोठी मंडळी आपल्या काम सांगतात किंवा लहानपणापासून एक सवय लावतात. आंघोळ करताना एकतरी कपडा अंगावर ठेवा अशी शिकवण देतात. विवस्त्र आंघोळ करु नका असं सांगतात. पण यामागील कारण हे 99 टक्के लोकांना माहिती नसतं. आज आपण या नियमामागील शास्त्रीय आणि वैज्ञानिक कारणही जाणून घेणार आहोत.

श्रीमद भागवत पुराणातील दहाव्या स्कंधात आणि बाविसाव्या अध्यायात कथा सांगण्यात आलं की, कृष्णासारखा पती आपल्याला मिळावा म्हणून गोपिकांनी कात्यायनी देवीचे व्रत केलंय.

मुलींनो, तुम्ही व्रतस्थ अवस्थेत विवस्त्र होऊन या पाण्यामध्ये स्नान केलेत. त्यामुळे जलदेवता वरुण आणि यमुना नदी यांची अवहेलना झालीय. म्हणून या दोघांचे निवारण करण्यासाठी तुम्ही आपले हात मस्तकावर जोडून त्यांना नमस्कार करा आणि नंतर आपापली वस्त्रे घ्या.

साधा शब्दात सांगायच म्हणजे विवस्त्र होऊ आंघोळ केल्यास जलदेवता आणि वरुण देवता यांची अवहेलना होते. त्यामुळे जलदेवता आणि वरुण देवता यांचा अनादर, अपमान होऊ नये म्हणून विवस्त्र होऊ कधीही आंघोळ करु नये.

हे असू शकतं या नियमामागील अजून एक कारण

पूर्वीच्या काळात एकत्र कुटुंब पद्धती असायची. अशावेळी आंघोळीसाठी बाथरुम हे वेगवेगळे नसायचे आणि जुन्या काळात त्याला न्हाणीघर म्हटलं जायचं. अनेक घरात त्याला दार नसायचं. परदा लावलेला असायचा. तर काही जुन्या न्हाणीघराला दार असलं तरी त्याला नीट कडी लागायची नाही. त्यामुळे पटकन कोणी आलं, अशावेळी आपल्या अंगावर कपडे नसेल तर आपलं रक्षण होत नाही. हे टाळण्यासाठी आंघोळ करताना एकतरी कपडा अंगावर असावा हा नियम सांगण्यात आला असावा.

About विश्व भारत

Check Also

मुंह में लौंग रखने के अनेकानेक बेहतरीन फायदे

जानिए मुंह में लौंग रखने के अनेकानेक बेहतरीन फायदे   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट …

शुगर पेशेंट के लिए रामबाण है यह सफेद मूसली : शरीर में बढ़ेगा इंसुलिन

शुगर पेशेंट के लिए रामबाण है यह सफेद मूसली : शरीर में बढ़ेगा इंसुलिन टेकचंद्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *