Breaking News

कढीपत्त्याच्या बियांचे सेवन मधुमेहींसाठी फायदेशीर

भारतामध्ये कढीपत्त्याचा वापर विविध पदार्थांमध्ये केला जातो. कढीपत्त्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात, जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात. कढीपत्ता मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी नैसर्गिक उपाय असल्याचेही म्हटले जाते. पण, यावर डॉक्टरांचे मत काय हे आपण आज जाणून घेणार आहोत.

हैदराबाद येथील ग्लेनेगल्स हॉस्पिटल्सचे वरिष्ठ सल्लागार फिजिशियन, डॉ. हरिचरण यांनी सांगितले की, कढीपत्त्याच्या बिया त्याच्या औषधी गुणधर्मांसाठी, विशेषतः मधुमेहाच्या व्यवस्थापनासाठी ओळखल्या जातात. “पानांप्रमाणेच बियांमध्ये अनेक बायोॲक्टिव्ह संयुगे असतात, जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करतात. या बिया इन्सुलिन संवेदनशीलता सुधारू शकतात आणि रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी करू शकतात, ज्यामुळे ते मधुमेहासाठी फायदेशीर ठरतात,” असे डॉ. हरिचरण म्हणाले.

संभाव्य फायदे

‘द डाएट एक्स्पर्ट्स’चे सीईओ आणि मुख्य आहारतज्ज्ञ, सिमरत कथुरिया यांनी सांगितले की, कढीपत्त्याच्या बियांमध्ये आढळणाऱ्या रसायनांपैकी एक असलेल्या महानिम्बाइनमध्ये हायपोग्लायसेमिक प्रभाव असू शकतो. “इन्सुलिनचे उत्पादन वाढवून, आतड्यांतील ग्लुकोजचे शोषण कमी करून आणि इन्सुलिन क्रियाकलाप सुधारून हे पदार्थ रक्तातील साखर कमी करण्यास मदत करतात. याव्यतिरिक्त, बियांमध्ये उच्च फायबर सामग्री पचन मंद करते, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी हळूहळू वाढते. त्यामुळे ते मधुमेहींसाठी पूरक आहेत,” असे कथुरिया म्हणाले.

कढीपत्ता वनस्पतीच्या बियांचे सेवन कसे करावे?

डॉ. हरिचरण यांनी सांगितले की, कढीपत्ता वनस्पतीच्या बिया वाळवून चूर्ण बनवले जाते आणि ते पाण्यात किंवा रोजच्या अन्नात मिसळतात. “साधारणपणे दररोज एक-दोन चमचे ही पावडर घेण्याची शिफारस केली जाते. शक्यतो सकाळी रिकाम्या पोटी हे चूर्ण पाण्यातून घ्यावे. हा नियम काही महिन्यांसाठी सुरू ठेवावा, परंतु रक्तातील साखरेच्या पातळीचे नियमितपणे निरीक्षण करणे आणि इतर औषधांसह या चूर्णाचे सेवन करावे की नाही, यासाठी हेल्थकेअरचा सल्ला घेणे आवश्यक आहे.”

कथुरिया यांच्या मते, कढीपत्त्याच्या बिया सकाळी नाश्त्यापूर्वी खाणे चांगले आहे. “या कालावधीत परिणामकारकता निश्चित करण्यासाठी रक्तातील साखरेच्या पातळीचे निरीक्षण करणे आवश्यक आहे. सकारात्मक परिणामांमुळे वैद्यकीय निरीक्षणाखाली कालावधी वाढू शकतो,” असे कथुरिया म्हणाले.

या गोष्टी लक्षात घ्या

कढीपत्त्याच्या बिया फायदेशीर असू शकतात, परंतु त्यांनी प्रिस्क्रिप्शन मधुमेहावरील औषधांची जागा घेऊ नये, असे आवाहन कथुरिया यांनी केले.

“पर्याय म्हणून ते अतिरिक्त सावधगिरी म्हणून लागू केले जाऊ शकतात. त्यांचा प्रभाव ग्लुकोजच्या चयापचय प्रक्रियांचे नैसर्गिकरित्या नियमन करण्याच्या त्यांच्या अंतर्भूत क्षमतेमुळे उद्भवते. परंतु संयम महत्त्वाचा आहे, कारण याचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने गॅस्ट्रोइंटेस्टाइनल त्रास किंवा मधुमेहाच्या औषधांशी संवादासह नकारात्मक परिणाम होऊ शकतात,” असे कथुरिया म्हणाले.

डॉ. हरिचरण यांनीदेखील सांगितले की, कढीपत्त्याची बियाणे योग्यरित्या वापरल्यास मधुमेहासाठी फायदेशीर ठरू शकतात, परंतु ते एका व्यापक मधुमेह व्यवस्थापन योजनेचा भाग असले पाहिजेत आणि कोणतेही नवीन उपचार सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.

About विश्व भारत

Check Also

काजू-बादाम से ताकतवर है राजस्थानी ड्राई फ्रूट्स की सब्जियां

काजू-बादाम से ताकतवर है राजस्थानी ड्राई फ्रूट्स की सब्जियां टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट   …

अश्वगंधा संग शहद का सेवन के रामबाण फायदे

अश्वगंधा संग शहद का सेवन के रामबाण फायदे   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट भारतीय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *