Breaking News

दाऊद इब्राहिम बॉलीवूडला पोसायचा आणि अभिनेत्री…!

Advertisements

दिग्दर्शक महेश भट यांनी दिग्दर्शित केलेला ‘आशिकी’ हा सिनेमा ९० च्या दशकात चाहत्यांच्या पसंतीस पडला होता. या सिनेमातील गाण्यांची अनेक तरुणांना भुरळ पडली होती. कुमार सानू यांनी गायलेल्या या गाण्यांना आजदेखील प्रेक्षकांचा तेवढाच प्रतिसाद मिळतो. सोशल मीडियावर आजही ही गाणी ऐकली जातात. त्याशिवाय ‘आशिकी’ हा सिनेमा अनु अग्रवाल व राहुल रॉय यांच्या अभिनयासाठीही ओळखला जातो.

Advertisements

 

अभिनेत्री अनु अग्रवालने ३५ वर्षांपूर्वी १९९० मध्ये महेश भट्ट यांच्या ब्लॉकबस्टर म्युझिकल रोमान्स चित्रपट ‘आशिकी’ मधून पदार्पण केले आणि ती प्रत्येक घरात प्रसिद्ध झाली. बॉलीवूड अभिनेत्री अनु अग्रवालनं एक धक्कादायक खुलासा करीत संपूर्ण इंडस्ट्रीचं पितळ उघडं पाडलं आहे.

Advertisements

 

अनु अग्रवालनं १९९० च्या दशकातील बॉलीवूड आणि अंडरवर्ल्डमधील घाणेरड्या संबंधांबद्दल उघडपणे सांगितले आहे. त्या काळाची आठवण करून देताना तिनं त्या काळातील चित्रपट व्यवसाय घाणेरडा असल्याचं वर्णन केलं. अनु अग्रवालनं त्या काळातील इंडस्ट्रीची काळी बाजू सर्वांसमोर उघड केली. त्या काळात अनेक फिल्म अंडरवर्ल्डच्या हिशोबानं चालत असल्याचंही तिनं सांगितलं.

 

अनु अग्रवाल म्हणाली की, सर्व पैसे अंडरवर्ल्डमधून आले होते. अनु अग्रवालने पिंकव्हिलाशी बोलताना, ९० च्या दशकात अंडरवर्ल्ड हिंदी चित्रपट उद्योगाशी किती खोलवर जोडलं गेलं होतं याबद्दल सांगितलं. तिनं खुलासा केला की, त्या काळातील बहुतेक चित्रपट ऑफ-द-रेकॉर्ड डीलद्वारे बुक केले जात होते, ज्यामध्ये दाऊद इब्राहिमसारख्या अंडरवर्ल्डच्या माणसांचा कंट्रोल असायचा.

 

अनु अग्रवालने दिलेल्या माहितीनुसार, त्यावेळी बॉलीवूडमध्ये येणारा जवळजवळ सर्व पैसा अंडरवर्ल्डशी निगडित होता, ज्यामुळे एका अशा उद्योगाचे चित्र तयार झाले, जे पूर्णपणे वेगळ्या नियमांखाली चालत होते.

 

बॉलीवूडमधील अनु अग्रवालचा हा पहिलाच चित्रपट होता. करिअरमधील पहिलाच चित्रपट ब्लॉकबस्टर ठरल्याने अनुला प्रचंड प्रसिद्धी मिळाली होती. मात्र, काही वर्षांनंतर ती फिल्म इंडस्ट्रीपासून दूर गेली. चाहत्यांना तिच्या चित्रपटांची प्रतीक्षा होती; मात्र त्यावेळी अनुला अपघाताचा सामना करावा लागला होता. या अपघातानं अनुचं संपूर्ण आयुष्यच बदललं होतं.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

Tateeree गाने पर मचे बवाल पर आया बादशाह का रिएक्शन

Tateeree गाने पर मचे बवाल पर आया बादशाह का रिएक्शन टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   …

Thalapathy Vijay, Trisha Krishnan attend wedding together amid affair allegation by actor’s wife

Actor Thalapathy Vijay attended a wedding in Chennai with actress Trisha Krishnan on Thursday, days …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *