Breaking News

नागपूरजवळ वीज कोसळून दोन महिला ठार : शेतात जेवायला बसलेल्या पाच महिलाही…!

Advertisements

नागपूर जिल्ह्यात मध्यंतरी पावसाने विश्रांती दिली होती. परंतु आता मागील दोन दिवसांपासून पून्हा अधून- मधून पाऊस पडत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात शेतीच्या कामांना चांगलीच गती मिळाली आहे. त्यातच नागपूर जिल्ह्यातील रामटेकमध्ये शेतीचे काम सुरू असतांना शुक्रवारी दुपारी नेहमीप्रमाने जेवणाची सुट्टी झाली. त्यानंतर येथील शेतात काम करणाऱ्या महिलांचा समूह जेवणाला बसला. दरम्यान एक आकस्मिक घटना घडली. त्यामुळे संपूर्ण नागपूर जिल्ह्याच हादरला. या धक्कादायक घटनेबाबत आपण जाणून घेऊ या.

Advertisements

 

नागपूर जिल्ह्यातील अनेक भागात शुक्रवारीही पाऊस पडला. त्यामुळे नागपूर जिल्ह्यातील रामटेक परिसरातही शेतीचे झटपट काम करण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी शेत मजूर वाढवले आहे. येथील रमेश जगन्नाथ राहते यांचे मौजा सोनेघाट ता. रामटेक येथील शेतातही शेतमजूर वाढवले गेले होते. या शेतात एकाच वेळी तब्बल २५ महिला मजूर काम करत होत्या. दरम्यान दुपारी येथे जेवणाची सुट्टी झाली. त्यामुळे सगळ्याच २५ महिला येथे डब्बा घेऊन सोबतच जेवायला बसल्या. दरम्यान येथे पावसासोबत वीज कडाडणे सुरू झाले. थोड्याच वेळात जोरदार वीज येथील महिलांच्या अंगावरच कोसळली. त्यात दोन महिलांचा मृत्यू झाला असून इतर पाच महिला जखमी झाल्या आहेत. रामटेक तालुक्यातील मौजा सोनेघाट इथं ही घटना घडली आहे.

Advertisements

 

मंगलाबाई मोटघरे (४०) रा. शितलवाडी परसोडा ता. रामटेक आणि वर्षा देवचंद हिंगे (३३) रा. भोजापुर, ता. रामटेक अशी मृत्यू झालेल्या महिलांची नावे आहे. तर जयश्री आकाश जवादे (३०) रा. रामेश्वर वॉर्ड, ता. रामटेक, रंजू राजू अष्टेकर (३८) रा. रामेश्वर वॉर्ड, ता. रामटेक, कलाबाई कवडू वरघणे (६०), प्रमिला वासुदेव आष्टनकर (४९) रा. भोजपुर, रामटेक, वनिता गजानन नागरीकर (५५) रा. रामेश्वर वॉर्ड, रामटेक असे जखमींची नावे आहे. या सगळ्यांना तातडीने रामटेकच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीत उपचार सुरू आहे. या घटनेची माहिती कळताच पोलिसांसह प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

 

राज्याच्या बऱ्याच भागात वीज कोसळल्या…

राज्याच्या काही भागात जोरदार तर काही भागात कमी पाऊस सुरू आहे. अनेक भागात विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी पावसाच्या मोठ्या सरी पडून गेल्या. काही भागात मुळसधार पाऊस झाला. दरम्यान, दरवर्षी पावसाळ्यात वीज कोसळ्याच्या घटना घडतात. यामध्ये अनेकांचा मृत्यू देखील होतो. कधी हे संकट लोकांवर येते तर कधी जनावरांचा देखील यामुळं मृत्यू होतो. यावर्षी देखील राज्याच्या विविध भागात वीज कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. विशेषत मराठवाडा आणि विदर्भात वीज कोसळून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

बहू-ससुर के बीच अनैतिक शारीरिक संबंध के चलते कर दी दोनो की हत्या

बहू-ससुर के बीच अनैतिक शारीरिक संबंध के चलते कर दी दोनो की हत्या टेकचंद्र शास्त्री: …

नागपुरातील काँग्रेस आमदाराने घेतली CM फडणवीसांची भेट

नागपूर कॉंग्रेसचे माजी शहराध्यक्ष आणि आमदार आमदार विकास ठाकरे यांनी शनिवारी रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *