Breaking News

कोरोना आणि वसुंधरा

Advertisements

चीन देशातून पसरलेल्या कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे संपूर्ण जगभरात लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे़ अनेकांना त्याची लागण झाली असून, हजारोंना ‘क्वारंटाईन’ करण्यात आले आहेत. जगातील बोटावर मोजण्याइतपत देश त्यापासून मुक्त राहिले आहेत़ अनेक देशांत ‘लॉकडाऊन’(टाळेबंदी) करण्यात आली आहे़ महत्त्वाचे उद्योगधंदे, कारखाने, कंपनी बंद ठेवण्यात आल्या आहेत़ सर्वसामान्य नागरिकांसह कामगारांना, मजुरांना, शासकीय कर्मचाºयांना (अत्यावश्यक सेवा वगळता) घरातच राहण्याचे निर्देश देण्यात आले आहे़ याशिवाय प्रत्येक भारतीय नागरिकाने वैयक्तिक स्वच्छता पाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे; परंतु त्याचवेळी या कोरोना विषाणूमुळे सुरूअसलेल्या ‘लॉकडाऊन’मुळे पृथ्वीला, धरणीमातेला, वसुंधरेला मोठा दिलासा मिळाला आहे. ही पृथ्वी आता अधिक स्वच्छ हवेचा श्वास घेत आहे. एका माहितीनुसार, धरतीवर अशी स्वच्छ हवा सुमारे ७५ वर्षांनंतर आढळली आहे. यापूर्वी दुसºया जागतिक महायुद्धानंतर इतकी स्वच्छ हवा होती, असेही सांगण्यात येत आहे. काही प्रसारमाध्यमांनी प्रकाशित केलेल्या वृत्तानुसार, दुसºया महायुद्धानंतर ही पहिली वेळ असेल, जेव्हा कार्बन उत्सर्जन सर्वांत कमी होत आहे. कोरोनामुळे अनेक देशांमध्ये ‘लॉकडाऊन’ जाहीर केल्याने जगभरात प्रदूषणाचे प्रमाण कमी झाले आहे.
‘ग्लोबल कार्बन प्रोजेक्ट’चे प्रमुख रॉब जॅक्सन यांनी म्हटले, की यावर्षी कार्बन उत्सर्जनमध्ये ५ टक्के घट झाली आहे. याआधी २००८ च्या आर्थिक मंदीमध्ये कार्बन उत्सर्जन कमी झाले होते. यावेळी १.४ टक्के घट दिसून आली होती. दुसºया महायुद्धाच्या काळात प्रामुख्याने युरोप, आशियातील अनेक देशांतील कारखाने, बाजारपेठा, वाहतूक, उद्योग पूर्णपणे बंद होते. त्यामुळे प्रदूषण कमी झाले. आता इतक्या वर्षांनंतर चित्र पाहायला मिळत आहे, असेही रॉब जॅक्सन यांनी म्हटले आहे. पर्यावरणतज्ज्ञ तसेच वैज्ञानिकांच्या मते, कोरोना विषाणूमुळे सुरू असलेल्या ‘लॉकडाऊन’मुळे जागतिक कार्बन उत्सर्जनमध्ये १० ते २० टक्के घट झाली आहे; पण हे जास्त काळ नसणार आहे. कारण २०२१ च्या सुरुवातीला तापमान पुन्हा वाढायला लागेल. त्यामुळे चिंता पुन्हा वाढणार, हे अपेक्षित आहे.
दरम्यान, संयुक्त राष्ट्राने (युनो) मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात एक अहवाल प्रकाशित केला होता. प्रत्येक वर्षी कार्बन उत्सर्जनमध्ये ७.६ टक्के इतकी घसरण झाली तरच ‘ग्लोबल वॉर्मिंग’अर्थात जागतिक तापमानात १.५ अंश सेल्सियसची कमतरता येईल.
हिंदी वृत्तपत्र राज एक्सप्रेसनुसार, एका नव्या अभ्यास सर्वेक्षणात पृथ्वी सभोवती असलेले सुरक्षा कवच अर्थात ओझोनच्या थरात सुधारणा होत आहे. पर्यावरण विज्ञान क्षेत्रातील संशोधन संस्था ‘सीआयआरईएस’ च्या (को-आॅपरेटिव्ह इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च इन एन्व्हायर्नमेंटल सायन्स) संशोधक अंतरा बँनर्जी यांनी युनिव्हर्सिटी आॅफ कोलोराडो बोल्डर येथे यासंदर्भात माहिती दिली. पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धात पर्यावरण बदलाविषयीचे संकेत मिळाले आहेत. हे बदल ‘मॉन्ट्रियल प्रोटोकॉल’मुळे ओझोनच्या थराचे छिद्र आंकुचन पावत असल्याने होत आहेत.

Advertisements
Advertisements

About Vishwbharat

Check Also

5 जिल्हाधिकऱ्यांची ‘ईडी’कडून चौकशी

पाच जिल्हाधिकाऱ्यांची सक्तवसुली संचालनालयापुढे (ईडी) चौकशी झाली. अवैध वाळू उपसा प्रकरणात चौकशी झाली आहे. यात …

नरेंद्र मोदी विचारमंच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शशीभूषण देसाई यांचा हजारो कार्यकर्त्यांसह हिंदु महासभा पक्षात प्रवेश

नरेंद्र मोदी विचारमंच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शशीभूषण देसाई यांचा हजारो कार्यकर्त्यांसह हिंदु महासभा पक्षात प्रवेश …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *