वर्धा : जिल्हा प्रतिनिधी :- बुधवार दि.16 रोजी आज 706 कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले आहे.ज्यामध्ये जिल्ह्यात 132 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे.यामध्ये 87 पुरुष तर 45 महिलांंचा समावेश आहे.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांंची सर्वात मोठी मृत्यू संख्या आज सलग दुसऱ्या दिवशीही झाली आहे .
आज जिल्ह्यात 7 रुग्णांंचा मृत्यू झाला आहे.यामध्ये (वर्धा- पुरुष 35, 60, 52, 50, 75,महिला 28, हिंगणघाट महिला 34 )असून जिल्ह्यात एकूण मृत्यू संख्या 68 झाली असून यामध्ये कोरोनामुळे मृत्यू -67 तर इतर आजारामुळे मृत्यू- 1चा मृत्यू झाला आहे. आज 50 व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहे.
आज आढळून आलेल्या रुग्णामध्ये
1) वर्धा 73 (पुरुष 47 महिला 26)
2)देवळी 11(पुरुष 6 महिला 5)
3) सेलू 5 (पुरुष 2 महिला 3 )
4)आर्वी 2 (पुरुष 2 )
5) कारंजा 4 (पुरुष 4)
6) समुद्रपूर 16 (पुरुष 11,महिला 5)
7)हिंगणघाट 21(पुरुष 15 महिला 6)
समावेश आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना चाचणीसाठी पाठववलेले स्त्राव नमुने 28667 असून यामध्ये 28628 अहवाल प्राप्त झाले आहे. तर एकूण 25491 अहवाल निगेटिव्ह आले आहे.तर यामध्ये 39 अहवाल प्रलंबित आहे.जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांंची संख्या 2873 झाली असून यामध्ये एकूण 1417 व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहे.
आज जिल्ह्यात एकूण 1388 ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहे.जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 76826 व्यक्ती गृह विलगिकरण करण्यात आले आहे.तर यामधून आज 2132 व्यक्ती गृहवीलगिकरणात आहे.
कोरोना चाचणी नेगेटिव्ह असल्यामुळे आज 599 व्यक्तींना रुग्णालयातून सुटी मिळालेले आहे.
जिल्ह्यात झपाट्याने वाढत असलेल्या कोरोनाबाधित रुग्ण संख्या व मृत्यू संख्या पाहता नागरिकांनी जास्त खबरदारी घेणे गरजेचे आहे.त्याच सोबत शासन नियमांचे पालन करणे सुद्धा गरजेचे आहे.