Breaking News

गडचांदूर भाजप महिला आघाडीतर्फे “गुड टच, बॅड टच” महिला दिना निमित्य कार्यक्रम

Advertisements
कोरपना(ता.प्र.):-
    जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने ८ मार्च रोजी गडचांदूर येथे भाजप महिला आघाडीच्या वतीने महिला दिन साजरा करण्यात आला.या कार्यक्रमात १२ वर्ष आतील मुलींना “गुड टच, बँड टच”(चांगला स्पर्श,वाईट स्पर्श)बद्दल अँड. दिपांजली मंथनवार,डॉ.सौ.कवीता पिंपळशेंडे, भाजपा जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्षा सौ.विजयालक्ष्मी डोहे यांनी अमूल्य असे मार्गदर्शन केले.तसेच गडचांदूर पोलीस स्टेशनच्या महिला कॉन्स्टेबल सौ.रेखा सुरनार यांनी महिलांसाठीचे नवीन कायदे संबंधी माहिती दिली.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून भाजप जिल्हा सचिव सौ.रंजनाताई मडावी, सौ.अर्पणा उपलेंचीवार यांची उपस्थिती होती. भाजप महिला आघाडी कार्यकर्त्या सौ.किरण सदनपवार,सौ.सपना सेलोकर,सौ.दाळे,सौ. गोरडवार,सौ.कावटकर,सौ.साळवे सह १० ते १२ वयोगटातील मुलींची उपस्थित होती. महिला दिनाच्या सर्वांना  शुभेच्छा देऊन सदर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
Advertisements

About Vishwbharat

Check Also

खूप झाले उत्सव, महोत्सव : आता रस्त्यांच्या दुरुस्तीकडे लक्ष द्या!

उत्सव, महोत्सव, सभा, संमेलन, लोकार्पण, उद्घाटन, बैठका, कीर्तन, भजन पुरे झाले, आता मृत्यूचे सापळे ठरणाऱ्या …

गोंदिया विमानतळावरून इंदूर,दिल्ली,बंगळुरू विमानसेवा

गोंदिया जिल्ह्यातील बिरसी येथील विमानतळावरून सध्या इंडिगोची गोंदिया-हैद्राबाद-तिरुपती ही विमानसेवा सुरू आहे. यानंतर १६ सप्टेंबर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *