Breaking News

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चंद्रपूर यांचे वतीने जागतिक महिला दिनी विविध कार्यक्रमाचे आयोजन

Advertisements

 दि.०८/०३/२०२१ सोमवार  :   चंद्रपूर जिल्हा कारागृह वर्ग-१ येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, चंद्रपूर यांचे वतीने महिला बंदीभगिनी करिता  जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आरोग्य शिबीर व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून सन्मा. न्या.जाधव साहेब सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, चंद्रपूर उपस्थित होते. तर प्रमुख उपस्थितीमध्ये कारागृहाचे प्रभारी अधीक्षक वैभव आत्राम,अतिरिक्त वरीष्ठ तुरुंगाधिकारी रविंद्र जगताप, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉ.सपना बिरेवार, कारागृहाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अमित डांगेवार, अंतर्गत तक्रार निवारण समिती सदस्या डॉ.भारती दुधानी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, चंद्रपूर च्या पी.एल.व्ही श्रीमती संध्या तोगर,  तुरुंग शिक्षक ललित मुंडे उपस्थित होते.  कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेतून कारागृहाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अमित डांगेवार यांनी कार्यक्रमाचे स्वरुप महिला बंदीवांनाना समजावून सांगीतले. तदनंतर कारागृहाचे प्रभारी अधीक्षक वैभव आत्राम यांनी सर्व महिला बंदी यांना जागतिक महिला दिनाचे शुभेछ्या दिल्या व सर्व महिला बंदी व महिला कर्मचारी यांनी सांस्कृतिक कार्यक्रम व आरोग्य शिबीराचा लाभ घेण्याबाबत सांगीतले. तर अध्यक्षीय भाषणामध्ये सन्मा. सन्मा. न्या.जाधव साहेब,सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांनी महिला बंदी भगिनी यांना जागतिक महिला दिनाचे शुभेछ्या देत सर्व महिलांमध्ये दया, करुणा, ममता हे उपजत दैवी गुण असल्याने पुरुषांचे तुलनेत त्यांचे अपराधामध्ये प्रमाण अत्यल्प असल्याचे प्रतिपादन केले तसेच सर्व महिला बंद्यानी सुटून समाजात परत गेल्यावर कधीही पुन्हा अपराधी कृत्य करु नये असे आव्हान केले.  तदनंतर जिल्हा सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.सपना बिरेवार मॅडम यांनी महिला बंद्याची आरोग्य तपासणी केली. यावेळी अंतर्गत तक्रार निवारण समिती सदस्या डॉ.भारती दुधानी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, चंद्रपूर च्या पी.एल.व्ही श्रीमती संध्या तोगर यांनी प्रत्येक महिला बंद्याना साडी व शैक्षणिक साहित्य भेट म्हणून दिले. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन तुरुंग शिक्षक ललित मुंडे यांनी केले. सदर कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी कारागृहाचे सुभेदार देवाजी फलके  महिला शिपाई रुपाली राठोड, उषा शाहू, हर्षा सिरिया, माधुरी नन्नावरे, पुजा कांबळे, रुपाली घोरपडे, प्रिया नारनवरे इत्यादीं  महिला  कर्मचारी यांनी विशेष परीश्रम घेतले.

Advertisements
Advertisements

About Vishwbharat

Check Also

वनाधिकाऱ्याला अटक : चंद्रपूरातील वाघांच्या शिकारीचे दिल्ली कनेक्शन

राज्यातील वाघांच्या शिकार प्रकरणात सेवानिवृत्त वनाधिकारी मिश्राम जाखड (८१) यांना दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. …

सापामुळे दोन दिवसांपासून गावातील पाणी पुरवठा बंद

विद्युत पुरवठा करणाऱ्या नदीवरील डीपीतील जनित्रात भला मोठा साप अडकून पडल्याने विद्यूत पुरवठा बंद झाला. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *