Advertisements

कोरपना(ता.प्र.):-
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने ८ मार्च रोजी गडचांदूर येथे भाजप महिला आघाडीच्या वतीने महिला दिन साजरा करण्यात आला.या कार्यक्रमात १२ वर्ष आतील मुलींना “गुड टच, बँड टच”(चांगला स्पर्श,वाईट स्पर्श)बद्दल अँड. दिपांजली मंथनवार,डॉ.सौ.कवीता पिंपळशेंडे, भाजपा जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्षा सौ.विजयालक्ष्मी डोहे यांनी अमूल्य असे मार्गदर्शन केले.तसेच गडचांदूर पोलीस स्टेशनच्या महिला कॉन्स्टेबल सौ.रेखा सुरनार यांनी महिलांसाठीचे नवीन कायदे संबंधी माहिती दिली.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून भाजप जिल्हा सचिव सौ.रंजनाताई मडावी, सौ.अर्पणा उपलेंचीवार यांची उपस्थिती होती. भाजप महिला आघाडी कार्यकर्त्या सौ.किरण सदनपवार,सौ.सपना सेलोकर,सौ.दाळे,सौ. गोरडवार,सौ.कावटकर,सौ.साळवे सह १० ते १२ वयोगटातील मुलींची उपस्थित होती. महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देऊन सदर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
Advertisements