Breaking News

आर्वीची वैशाली हिवसे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या पहिली महिला सिईओ

आर्वीची वैशाली हिवसे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या पहिली महिला सिईओ
वर्धा-
आर्वीतील वैशाली सुरेशचंद्र हिवसे यांची बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन या कंपनीने कमांडिंग ऑफिसरपदी नियुक्ती केली आहे. पहिल्या महिला अधिकारी म्हणून वर्धा जिल्ह्याचेच नव्हे तर विदर्भाचे नाव मोठं केले आहे.
रोड कंट्रक्शन कंपनीने (आरसीसी) इंडिया चीन बॉर्डर कनेक्टिव्हिटीची जबाबदारी महिला सशक्तीकरण म्हणून आर्वीच्या वैशाली हिवसे यांना दिली. वैशालीचे दहावीपर्यंतचे शिक्षण येथील मॉडेल हायस्कूलमध्ये झाले होते त्यानंतर येथील नगरपालिका कनिष्ठ महाविद्यालयात त्यांनी बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यावर सेवाग्राम बापूराव देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालयात सिव्हिल अभियांत्रिकीची पदवी घेतली. नागपूरला रामदेव बाबा कॉलेजमध्ये एम.टेक् करून यूपीएससीची परीक्षा दिली. त्यानंतर बॉर्डर ऑर्गनायझेशनमध्ये तिची निवड झाली. चीन चायना बॉर्डर सध्याचे बांधकाम चालू आहे. त्यांचा पूर्ण कार्यभार व त्यांची देखरेख वैशालीकडे आहे. डिफेन्स आणि आर्मीशी निगडीत दहा वर्षापासून ती कार्यरत आहे. वैशाली हिवसे सिव्हिल कार्यकारी अभियंता आहे. तिने कारगिल येथे दहा वर्ष आव्हानात्मक परिस्थितीत कार्य केले. सोबतच दहा हजार फूट उंच पहाडीवर वळण रस्ते, बोगदे आणि रस्तेचे संलग्निकरणांचे करण्याचे काम करून ते बॉर्डर रोड ऑर्गनिझेशनने पूर्णत्वास नेले आहे. मागील वर्षी बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन च्या वतीने बोगदा आंतरिक मार्गाची निर्मिती केली.
चायना बॉर्डरच्या रस्त्याचे काम तिने केले. ही बॉर्डर भारत चीन लागून लद्दाख सेंटरमध्ये आहे. सध्या लद्दाख जम्मू-काश्मीर उत्तराखंड हिमालय प्रदेश अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम या प्रांतात नियोजित मार्गाचे काम सुरू आहे. 61 रस्त्याचे सुनियोजित कामाचे चायना बॉर्डरवरील हे कार्य डिसेंबर 2022 मध्ये पूर्ण करणार आहे. त्यासाठी सर्व सोयी सुविधा यंत्रसामग्रीची व्यवस्था करण्यात आली आहे. अशा कठीण कामात महिलांचे सशक्तीकरण करण्यासाठी महिलांना पुढाकार देण्याचे कार्य बीआरओ करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. आधुनिक परिस्थितीत महिला सशक्तीकरणसाठी पाऊले उचलली असून महिला अधिकारी चांगल्या तर्‍हेने हे आव्हानात्मक कार्य पूर्ण करू शकतात म्हणून महिलांना जबाबदारी देण्यात आल्याचा विश्वास व्यक्त केला असून तिनेही माहिती ट्विटरवर दिली आहे.

About Vishwbharat

Check Also

नागपुरातील मेट्रोचा प्रवास होणार स्वस्त

शाळा, महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्थाना लागणा-या उन्हाळ्याच्या सुट्ट्या लक्षात घेता महामेट्रोने मेट्रोच्या प्रवासी भाड्यात …

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात सामान्यांना भोपळा मिळणार काय?

महाराष्ट्रात विदर्भाला जोडण्यासाठी तत्कालीन राज्यकर्त्यांनी 28 सप्टेंबर 1953 ला नागपूर करार केला.त्यानुसार यंदाही नागपुरात हिवाळी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *