Breaking News

गत 24 तासात 1282  कोरोनामुक्त, 674 पॉझिटिव्ह तर 20 मृत्यू

Advertisements

गत 24 तासात 1282  कोरोनामुक्त,

Advertisements

674 पॉझिटिव्ह तर 20 मृत्यू

Advertisements

Ø  आतापर्यंत 66,226 जणांची कोरोनावर मात

Ø  ॲक्टीव पॉझिटिव्ह 10,097

चंद्रपूर, दि.16 मे : जिल्ह्यात मागील 24 तासात 1282 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 674 कोरोना बाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 20 बाधीतांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 77 हजार 575 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 66 हजार 226 झाली आहे. सध्या 10 हजार 97 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 4 लाख 34 हजार 760 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 3 लाख 53 हजार 903 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यामध्ये चंद्रपूर शहरातील गजानन महाराज मंदिर चौक परिसरातील 62 व 77 वर्षीय पुरुष, तुकुम येथील 75 वर्षीय महिला, रामनगर येथील 42 वर्षीय पुरुष, 35 वर्षीय पुरुष. भद्रावती तालुक्यातील कोंढा येथील 54 वर्षीय महिला, 60 वर्षीय महिला, घोडपेठ येथील 31 वर्षीय महिला. बल्लारपूर तालुक्यातील 65 वर्षीय पुरुष. सावली तालुक्यातील 70 वर्षीय महिला. चिमूर तालुक्यातील 62 वर्षीय पुरुष, वडाळा पैकु येथील 60 वर्षीय पुरुष. सिंदेवाही तालुक्यातील नांदगाव येथील 65 वर्षीय महिला. नागभीड तालुक्यातील नवखळा येथील 55 वर्षीय पुरुष. ब्रह्मपुरी तालुक्यातील कुर्झा येथील 60 वर्षीय पुरुष. राजुरा तालुक्यातील 46 वर्षीय पुरुष. मूल तालुक्यातील 59 वर्षीय महिला. कोरपना तालुक्यातील 45 वर्षीय पुरुष, 65 वर्षीय महिला तर वणी-यवतमाळ येथील 55 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 1252 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 1159 , तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 35, यवतमाळ 40, भंडारा 11,वर्धा एक, गोंदिया दोन आणि नागपूर येथील दोन बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 674 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 227, चंद्रपूर तालुका 20, बल्लारपूर 80, भद्रावती 47, ब्रम्हपुरी 20, नागभिड 10,सिंदेवाही 31, मूल 38, सावली 26, पोंभूर्णा 34, गोंडपिपरी 04, राजूरा 34, चिमूर 04, वरोरा 45, कोरपना 40, जिवती 08 व इतर ठिकाणच्या 06 रुग्णांचा समावेश आहे.

नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

Advertisements

About Vishwbharat

Check Also

नागपुरात आणखी ५ दिवस उन्हाचा कहर : पण नागपूर रेल्वे स्थानक…!

नागपूरसह विदर्भात उष्णतेची लाट असून वाढत्या तापमानामुळे लोकांची होरपळ होत आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर रेल्वे …

नागपुरातील मेट्रोचा प्रवास होणार स्वस्त

शाळा, महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्थाना लागणा-या उन्हाळ्याच्या सुट्ट्या लक्षात घेता महामेट्रोने मेट्रोच्या प्रवासी भाड्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *