Breaking News

3 हजार रुपयांची लाच स्वीकारताना मंडळ अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात

Advertisements

3 हजार रुपयांची लाच स्वीकारताना मंडळ अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात

Advertisements

मूल,
तालुक्यातील भेजगाव येथील एका शेतकर्‍याकडून फेरफारकरिता 3 हजार रुपयांची लाच स्वीकारताना बेंबाळ महसूल मंडळाचे निरीक्षक महादेव कन्नाके यास चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवार, 21 जून रोजी दूपारी 12 वाजताच्या सुमारास रंगेहात पकडले.

Advertisements

भेजगाव येथील शेतकरी आणि सरपंच अखिल गांगरेड्डीवार यांच्याकडून फेरफारकरिता महादेव कन्नाके यांनी 5 हजार रुपयांची मागणी केली. तीन हजारांमध्ये तडजोड झाली. मात्र, अखिल गांगरेड्डीवार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी चंद्रपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. दरम्यान, सोमवारी लाचलुचपत विभागाने मूल तहसील कार्यालयाजवळ सापळा रचला आणि अखिल गांगरेड्डीवार यांच्याकडून तीन हजार रुपये स्वीकाराताना महादेव कन्नाके यास रंगेहात पकडले.

Advertisements

About Vishwbharat

Check Also

नागपुरात आणखी ५ दिवस उन्हाचा कहर : पण नागपूर रेल्वे स्थानक…!

नागपूरसह विदर्भात उष्णतेची लाट असून वाढत्या तापमानामुळे लोकांची होरपळ होत आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर रेल्वे …

नागपुरातील मेट्रोचा प्रवास होणार स्वस्त

शाळा, महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्थाना लागणा-या उन्हाळ्याच्या सुट्ट्या लक्षात घेता महामेट्रोने मेट्रोच्या प्रवासी भाड्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *