ग्रीन जिम, खेळणी, सौंदर्यीकरणाला मंजुरी
चंद्रपूर, ता. 30 : महिला बालकल्याण समिती सदस्यांच्या प्रभागामध्ये ग्रीन जिम, खेळणी, ओपणस्पेसला सुरक्षा भिंत करणे, ओपनस्पेसचे सौंदर्गीकरण करण्याच्या कामाला समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीतील राणी हिराई सभागृहात मंगळवारी (ता. २९) महिला व बालकल्याण समितीची बैठक पार पडली. यावेळी सभापती चंद्रकला सोयाम, उपसभापती पुष्पाताई उराडे, समिती सदस्य मंगला आखरे, जयश्री जुमडे, आशा आबोजवार, खुशबू चौधरी, शिला चव्हाण, प्रदीप डे आदींची उपस्थिती होती. सभेच्या प्रारंभी माजी नगराध्यक्ष स्व. रमेश कोतपल्लीवार, काशिनाथ घटे यांच्यासह अन्य दिवंगत मान्यवरांना श्रद्धाजंली वाहण्यात आली.
महिला बालकल्याण समितीच्या सर्व सदस्यानी त्यांच्या प्रभागात नागरिकांना फिरण्याकरीता, मनोरंजनाकरीता तसेच व्यायाम करण्याकरिता प्रभागातील ओपनस्पेसमध्ये ग्रिन जीम (खेळणीसह) ओपनस्पेसचे सुरक्षा भिंतीसह सौदर्याकरण करण्यासाठी चर्चा करण्यात आली. त्यावर महिला व बालकल्याण समितीच्या सदस्यांनी मंजुरी दिली. सभेत चंद्रपूर शहर महानगरपालिका क्षेत्रात माहे फेब्रुवारी २०२१ ते मे २०२१ चा जन्म अहवाल आकडेवारी सादर करण्यात आली.