Breaking News

बुधवारी एकही मृत्यु नाही, 12 कोरोनामुक्त 18 पॉझिटिव्ह , ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या 175

Advertisements

बुधवारी एकही मृत्यु नाही, 12 कोरोनामुक्त 18 पॉझिटिव्ह

Advertisements

Ø ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या 175

Advertisements

चंद्रपूर,दि.7 जुलै : गत 24 तासात जिल्ह्यात 12 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 18 जण नव्याने पॉझिटीव्ह आले आहेत. जिल्हयात बुधवारी एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही.

आरोग्य विभागाच्या प्राप्त अहवालानुसार बाधित आलेल्या 18 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील 4, चंद्रपूर तालुका 1, बल्लारपूर 2, भद्रावती 0, ब्रम्हपुरी 0, नागभीड 1, सिंदेवाही 0, मूल 1, सावली 1, पोंभूर्णा 0, गोंडपिपरी 0, राजूरा 2, चिमूर 0, वरोरा 5, कोरपना 1, जिवती 0 व इतर ठिकाणच्या 0 रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 84 हजार 768 वर पोहोचली आहे.

तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 83 हजार 61 झाली आहे. सध्या 175 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 5 लाख 72 हजार 839 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 4 लाख 85 हजार 9 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1532 बाधितांचे मृत्यू झाले आहे.

प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे

Advertisements

About Vishwbharat

Check Also

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात पत्रकारांसाठी कॅन्टीन आणि झुणका भाकर केंद्र

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात पत्रकारांसाठी भव्य व्यासपीठ उभारण्यात आले आहे. पत्रकार ताटकळत उन्हात उभे राहून कार्य …

नागपूर विमानतल टी पाईंट से खामला, शंकर नगर तक उडानपुल मंजूर करे : अखिल भारत हिन्दू महासभा का प्रधानमंत्री को ज्ञापन

नागपुर। अखिल भारत हिन्दू महासभा के महाराष्ट्र प्रमुख मोहन कारेमोरे ने प्रधान मंत्री नरेन्द्र मोदी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *