डॉ.शेळके आत्महत्या प्रकरणी संबंधितांवर कारवाई करा.
(कोरपना तालुका वैद्यकीय अधिकार्यांना निवेदन.)
कोरपना (ता.प्र.):-
अहमदनगर जिल्ह्याच्या पाथर्डी तालुक्यातील करंजी आरोग्य उपकेंद्रातील डॉ.गणेश गोवर्धन शेळके यांनी वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्या प्रकरणी संबंधित आरोपींना अटक करून गुन्हा दाखल करण्यात यावा आशी मागणी कोरपना तालुक्यातील समस्त आरोग्य अधिकार्यांनी केली आहे.याविषयीचे निवेदन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.स्वप्नील टेंभे यांना देण्यात आले आहे.यावेळी डॉ. सुशील चंदनखेडे,डॉ.रुपाली येवले,डॉ.निलेश गोडे.कु.मेघा कोरडे,कु.पुजा दांडेकर,कु. अश्विनी राहूलगडे,कु.काळे व कु.श्वेता देवगडे यांची उपस्थिती होती.

डॉ.शेळके आत्महत्या प्रकरणी संबंधितांवर कारवाई करा. ,कोरपना तालुका वैद्यकीय अधिकार्यांना निवेदन.)
Advertisements
Advertisements
Advertisements