Breaking News

स्थानिक उपाशी,परप्रांतीय तुपाशी” दालमिया सिमेंट कामगार आक्रमक., कंपनी प्रशासनाच्या विनंतीवरून सात दिवसाची अवधी.आंदोलन मात्र सुरूच

Advertisements

स्थानिक उपाशी,परप्रांतीय तुपाशी” दालमिया सिमेंट कामगार आक्रमक.
(कंपनी प्रशासनाच्या विनंतीवरून सात दिवसाची अवधी.आंदोलन मात्र सुरूच)
कोरपना (ता.प्र.):-
कोरपना तालुक्यातील नारंडा येथील दालमिया सिमेंट कंपनीत पुर्वीच्या कामगारांना दिलेल्या आश्वासनांनंतर सुद्धा यांना कामावर रुजू न करता परप्रांतीय मजुरांचा बिनधास्तपणे भरणा केला जात आहे.हे चित्र पाहून अन्यायग्रस्त स्थानिक कामगारांनी दालमिया सिमेंट कंपनीसमोर सहकुटुंब आंदोलन सुरू केले आहे.जोपर्यंत जुन्या कामगारांना कामावर घेतले जात नाही तोपर्यंत उद्योग चालू देणार नाही अशी भुमिका घेत “नारंडा सिमेंट कामगार संघ सलग्न हिंद मजदूर सभा” या संघटनेतर्फे ६ जुलैपासून दालमिया सिमेंट कंपनीसमोर आंदोलन उभारण्यात आले.मुरली सिमेंट हस्तांतरणावेळी येथील जुन्या कामरांना परत कामावर घेण्याचे आश्वासन देण्यात आले होते. आता मात्र याठिकाणी परराज्यातील कामगारांचा भरणा केला जात आहे. “स्थानिक उपाशी,परप्रांतीय तुपाशी” अशी परिस्थिती सध्या याठिकाणी पहायला मिळत आहे.
कंपनीकडून शोषण होत असल्याने कामगारांमध्ये तीव्र असंतोष उफाळला असून अन्याय सहन न करता न्याय मिळावा यासाठी सदर आंदोलन उभारण्यात आले आहे.काम ठप्प पडल्याने कंपनी प्रशासनाने आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी आंदोलनकर्ते कामगार संघटना पदाधिकाऱ्यांना चर्चेसाठी बोलावले व मागण्या संदर्भात निर्णय घेण्यासाठी सात दिवसाची अवधी मागितली.संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत मोठ्या मनाने हे मान्य केले.परंतु सात दिवसात जर समाधानकारक निर्णय न झाल्यास आठव्या दिवशी पुन्हा आंदोलन जैसे थे राहणार असे कंपनी प्रशासनाला म्हटले आहे.
पुर्वीच्या मुरली सिमेंट कंपनीने कामगारांना २०१५ पर्यंतचे थकीत वेतन अजूनही दिलेले नाही.अंदाजे पाचशे कामगारांना आर्थिक, मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.पूर्वी जे कामावर होते अशा कंत्राटी तसेच पॅकिंग प्लाँट व कायमस्वरूपी अशा सर्व कामगारांना न्याय देण्याऐवजी नवीन परप्रांतीयांना २८० ते ३५० रु.प्रमाणे कंत्राटदारामार्फत कामावर घेतले जात आहे.स्थानिक कामगारांना व्हेजबोर्ड प्रमाणे रोजी तर सोडाच यांचे पीएफ ही कपात केले जात नाही.परिणामी यांचे भविष्य धोक्यात आले आहे.मजूर जर एक,दोन दिवस कामावर आले नाही तर कंत्राटदार कामावरून काढून टाकण्याची धमकी देतात. याकारणाणे कामगार वर्गात असंतोष वाढत असून तीव्र नाराजी पसरली आहे.आंदोलन सुरूच असून फक्त कंपनी प्रशासनाच्या विनंतीवरून सात दिवसासाठी शिथिल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.आंदोलना दरम्यान राजूरा विधानसभेचे माजी आमदार अँड.वामनराव चटप,राकाँचे सै. आबीद अली यांच्यासह इतरही नेत्यांनी आंदोलनकर्यांची भेट घेऊन व्यथा जाणून घेतल्या.सदर आंदोलनात नारंडा कामगार संघटना अध्यक्ष मनोज भटारकर,सचिव रमेश वेट्टी,गुरूदास वराते,बंडू हेकाड,अमोल वाघमारे, सुरेश खंडाळे,बालाजी शिंदे आदी कार्यकर्ते व कामगारांची मोठ्यासंख्यने उपस्थिती होती.
———–//——-

Advertisements

दालमिया सिमेंट कंपनी मॅनेजमेंट आणि आंदोलनकर्ते कामगारांमध्ये ८ जुन रोजी चर्चा झाली.कंपनीने वेळ मागितल्या प्रमाणे आम्ही त्यांना ७ दिवसाची मुदत दिली.मागण्या संदर्भात काही सकारात्मक घडले नाही तर ७ दिवसानंतर पुन्हा आम्ही आंदोलन करू.आम्ही आंदोलन मागे घेतलेला नाही.त्यांच्या मागणीनुसार कामगारांना काम करण्याची मोहलत दिली आहे.त्यानंतर पुन्हा आम्ही आंदोलन तीव्र करू आणि सामोरचे कार्य करू, लेखी काही दिलेले नाही फक्त त्यांना वेळ दिलेली आहे याच्या व्यतिरिक्त काही केलेला नाही.
“मनोज भटारकर”
कामगार संघटना अध्यक्ष

Advertisements
Advertisements

About Vishwbharat

Check Also

नागपूर विमानतल टी पाईंट से खामला, शंकर नगर तक उडानपुल मंजूर करे : अखिल भारत हिन्दू महासभा का प्रधानमंत्री को ज्ञापन

नागपुर। अखिल भारत हिन्दू महासभा के महाराष्ट्र प्रमुख मोहन कारेमोरे ने प्रधान मंत्री नरेन्द्र मोदी …

बसपा प्रदेश महासचिव सिंगाडे के हाथों किराना व्यवसायी, पत्रकार खंडेलवाल सम्मानित

✍️टेकचंद्र सनोडिया शास्त्री की रिपोर्ट नागपूर : कोराडी-महादुला टी पाईंट डॉ बाबा साहाब चौक पर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *