वर्धा : येथील नागरिकांनी रंगांची उधळण न करता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांची उधळण करण्याचा प्रत्यक्ष प्रयत्न केला आहे. गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपासून येथील गावकरी इतर गावांप्रमाणे होलिका दहन किंवा रंग उधळत जोरजोरात गाणे वाजवत होळी साजरी करणे पसंत करत नसून धुलिवंदनच्या दिवशी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा प्रसार करून गाव आदर्श बनविण्यासाठी येथील गावकरी प्रयत्न करतात. त्यासाठी दरवर्षी पहाटे राष्ट्रसंतांची पार्थना त्यानंतर प्रभातफेरी आणि प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. विशेषतः यात गावातील चिमुकल्यांचा मोठ्या उत्साहात सहभाग असतो.

वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील सुरगांव येथे धुलिवंदन साजरा करण्याचा एक आगळा-वेगळा सोहळा साजरा केला गेला.
Advertisements
Advertisements
Advertisements