Breaking News

सप्टेंबर अखेर राज्यात निवडणूक

Advertisements

मोहन कारेमोरे

Advertisements

नागपूर : महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद,पंचायत समितीवरील प्रशासकाची मुदत 15 सप्टेंबरनंतर संपुष्टात येईल.

Advertisements

त्यामुळे दिवाळीपूर्वी निवडणुकीचा पहिला टप्पा सुरु होईल.राज्यातील १८ महापालिका, १६४ नगरपरिषदा, २५ जिल्हा परिषदा, २८४ पंचायत समित्यांची मुदत यापूर्वीच संपुष्टात आली आहे.फेब्रुवारी-मार्च २०२२ पासून प्रशासक आहेत. १५ सप्टेंबरनंतर प्रशासकाला सहा महिने पूर्ण होत आहेत.

राज्यातील ओबीसींना राजकीय आरक्षण मिळावे, यासाठी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने स्वतंत्र कायदा करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सहा महिन्यांसाठी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. आता ती मुदत सप्टेंबरमध्ये संपणार आहे. सप्टेंबरअखेरीस पावसाळा पण संपेल. त्यामुळे दिवाळीपूर्वी निवडणूक घ्यावीच लागणार आहे.

अशी होणार निवडणूक

पहिल्या टप्प्यातील महापालिका मुंबई, पिंपरी-चिंचवड, ठाणे, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, पनवेल, मीरा-भाईंदर, सोलापूर, नाशिक, मालेगाव, परभणी, नांदेड-वाघाळा, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर, चंद्रपूर या १८ महापालिकांची निवडणूक पहिल्या टप्प्यात होणार आहे. त्यासोबतच १६४ नगरपरिषदांची देखील निवडणूक ओबीसी आरक्षणासह होईल. तर, दुसऱ्या टप्प्यात २५ जिल्हा परिषदा आणि २८४ पंचायत समित्यांची निवडणूक होईल, असेही निवडणूक विभागातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

BJP की घोषणा से पहले ही पूर्व संसद संजय निरुपम ने मैनिफेस्टो को लेकर कांग्रेस को घेरा

BJP की घोषणा से पहले ही पूर्व संसद संजय निरुपम ने मैनिफेस्टो को लेकर कांग्रेस …

फडणवीस, वडेट्टीवारांचे प्रचारादरम्यान एकमेकांबद्दल मौन का? चर्चाना उधाण

विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे लवकरच भजपमध्ये प्रवेश करतील,असा दावा करून राज्याचे अन्न व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *