नागपूर : शासनाने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली ई-पीक पेरा योजना शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. महसूल, कृषी विभागाची जबाबदारी असताना या योजनेची कामे शेतकऱ्यांनी करावी, असा आग्रह केला जातोय, असा दावा शेतकरी संघटना व विदर्भ राज्य आंदोलन समितीने केला आहे.अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तहसीलदारांना यासंदर्भात निवेदन देण्यात आले.
गत वर्षीपासून ई -पीक पेरा नोंदणी योजना सुरु केली. योजनेला अल्प प्रतिसाद मिळत असला तरी यावर्षी ई-पीक योजना राबवली जात आहे. त्यामुळे ई-पीक पेरा नोंदणीची कामे शेतकऱ्यांंना करण्याचा आग्रह का? ही कामे शेतकऱ्यावर लादू नका अशी मागणी शेतकरी संघटना व विदर्भ राज्य आंदोलन समितीने निवेदनात केली आहे.
… तर मदतीपासून वंचित
ई – पीकपेरा नोंदणी करीता बहुतांश शेतकऱ्याकडे स्मार्ट मोबाईल नाही. त्यांना नोंदणी करता येत नाही. त्यामुळे शेतकरी पीक पेरा नोंदविण्यापासून वंचित राहतील. आर्थिक, मानसिक व शारीरिकरित्या खचलेल्या शेतकऱ्यांनी स्वतःच पीक पेरा कसा भरावा,असा प्रश्न आहे.यावर तोडगा काढून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी करण्यात येत आहे.