नाशिक : जगप्रसिद्ध सप्तश्रृंगी देवीचे मंदीर मागील 45 दिवसापासून दर्शनासाठी बंद आहे. मात्र, भाविकांची प्रतिक्षा संपली असून नवरात्रीच्या पहिल्या माळेला म्हणजेच 26 सप्टेंबर रोजी मंदीर खुले होणार आहे.
मंदीर बंदचे नेमके कारण काय?
मंदिराचे काही काम अपूर्ण असल्याने मंदिर खुले होण्याचा मुहूर्त 21 दिवस पुढे ढकलला आहे.नाशिकमध्ये जुलैमध्ये ढगफूटी झाल्यामुळे मोठा गोंधळ उडाला होता. तसेच झालेल्या पावसामुळे अनेक भावीक जखमी झाले होते. म्हणून या पार्श्वभूमीवर सप्तशृंगी देवी मंदिर पुढील दीड महिना बंद ठेवण्यात आले होते. शिवाय मंदिराच्या डागडुजी साठी भाविकांना दर्शनासाठी मज्जाव करण्यात आला होता. मात्र, आता नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी भाविकांना सप्तश्रृंगी मातेचे दर्शन घेता येणार आहे.