मुंबई : ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ व ‘गाव तिथे एसटी’ अशी संकल्पना राबवून महामंडळ प्रवाशांच्या सेवेला व सुविधेला प्राधान्य देत आहे. तरीही, थांबा निश्चित असतानाही बस न थांबविणाऱ्या चालक-वाहकांवर कारवाई करण्यात येणार आहे. तसे संकेत महामंडळाने दिले आहेत.
कर्मचाऱ्यांकडून प्रवासी हित जोपासत नसल्याचे आढळून आल्यास एसटी महामंडळाने आता कठोर पवित्रा घेतला आहे. तशा सूचना महामंडळाने सर्व आगार कार्यालयाला दिल्या आहेत. प्रवासी रस्त्यावर आहे. त्यांना हात दिल्यास त्यांना घेतलेच पाहिजे. त्यावर कुठलीही हयगय खपवून घेतली जाणार नाही. याची गंभीर दखल घेऊन चालक आणि वाहक दोघांवरही कारवाई करण्यात येईल. चालक-वाहकांना सूचना आहेत की, प्रत्येक मार्गावरील प्रवासी उचलायला हवा. नियोजित बस थांब्यावर बस थांबायलाच हवी, असे महामंडळाचे मत आहे.