नागपूर : कोरोनानंतर निर्बंधांविना गणेश उत्सव साजरा होत आहे. त्यामुळे गणेशभक्तांमध्ये मोठा उत्साह असून आज शुक्रवारी (९ सप्टेंबर) राज्यात ७० हजार सार्वजनिक गणेश मंडळांमार्फत विसर्जन होणार आहेत.यासाठी लाखो गणेशभक्त मिरवणुकीत सहभागी होतील. मुंबईत १ लाख, नागपुरात 20 हजार घरगुती बाप्पांना निरोप दिला जाईल.
सर्वत्र पावसाचा इशारा; राज्यात पोलिसांचा बंदोबस्त
राज्यासह मुंबईत ९ व १० सप्टेंबर २०२२ रोजी जोरदार पावसाची शक्यता असल्याने गणेशभक्तांनी सावधगिरी बाळगावी, असा इशारा मुंबई महापालिकेने दिला आहे. मुंबईत १२५०० सार्वजनिक गणेश मंडळे असून अडीच लाख घरगुती गणेशमूर्ती स्थानापन्न केल्या जातात. ६० टक्के घरगुती गणेशांचे विसर्जन झालेले आहे.