Breaking News

‘लम्पी’चे थैमान,75 हजार गायी दगावल्या

Advertisements

मोहन कारेमोरे

Advertisements

नागपूर : लम्पी या रोगाचा देशात १५ राज्यांमधील १७५ जिल्ह्यांत प्रादुर्भाव झाला आहे. अधिकृत आकडेवारीनुसार देशभरात आतापर्यंत १५ लाखांपेक्षा अधिक गायी तसेच जनावरांना याची लागण झाली असून आतापर्यंत ७५ हजार गायी दगावल्या आहेत. प्रत्यक्षात याचा आकडा अधिक असण्याची शक्यता आहे. मात्र देशात ५७ हजार गायी मृत्युमुखी पडल्याचे केंद्र सरकारने सांगितले.

Advertisements

राज्यात लम्पी आजाराच्या प्रादुर्भावाने मृत झालेल्या जनावरांसाठी शेतकरी, पशुपालकांना जिल्हा परिषदेच्या निधीतून १० हजार रुपये मदत देण्याचे आदेश महसूल, पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गुरुवारी जळगाव येथील बैठकीत दिले आहेत.

पशुधनाची आकडेवारी

राजस्थानमध्ये ३३ पैकी ३१, गुजरातमध्ये ३३ पैकी २६, पंजाबच्या सर्व म्हणजे २३, हरियाणातही सर्व २२ आणि उत्तर प्रदेशातील ७५ पैकी २१ जिल्ह्यांत लम्पीचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात आहे.तर महाराष्ट्रात त्यातुलनेने कमी म्हणजे १७ जिल्ह्यांमध्ये याचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे विशेषत: गो पालनावर अवलंबून असलेल्या कुटुंबांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

दुधाची टंचाई

दुसरीकडे दुधाचीही टंचाई जाणवत आहे. ज्या राज्यांमध्ये प्रादुर्भावर मोठ्या प्रमाणात आहे तिथे पाऊस कधी थांबतो याकडे राज्य सरकारांचे लक्ष लागून आहे. पावसामुळे या आजाराचा प्रादुर्भाव अधिक होत असल्याचे मानले जात आहे. पाऊस थांबताच डास,माश्या कमी होतील आणि लम्पी आटोक्यात येऊ शकेल. दरम्यान,जनावरांचे लसीकरणही वेगात सुरु आहे. सध्या गायींना पॉक्स लस दिली जात आहे. राष्ट्रीय अश्व संशोधन केंद्र आणि भारतीय पशु चिकित्सा संशोधन संस्था स्वदेशी लस निर्मितीची तयारी करीत आहे. लम्पी लागण झाल्यास गायीचे दूध कमी होते. आमच्याकडे पुरवठा अर्धा टक्का घटला आहे. सणासुदीपर्यंत परिस्थितीत सुधारणा होण्याची आशा आहे.

नेमका आजार काय?

हा आजार जुलै २०१९ मध्ये प्रथम बांगलादेशात आढळला. त्याचवर्षी भारतातील पूर्वेकडील राज्ये पश्चिम बंगाल व ओडिशामध्ये व यावर्षी अंदमान-निकोबारसह पश्चिम आणि उत्तरेकडील राज्यात प्रादुर्भाव झाला. लम्पी विषाणूमुळे चर्मरोग होतो.जनावरांमध्ये त्याची झपाट्याने लागण होते. काही डास, माशा आणि चिलटांद्वारे याचा फैलाव होतो.

महाराष्ट्रातील स्थिती

1435 बाधित जनावरे
52 जनावरे दगावली
17 जिल्ह्यांमध्ये प्रादुर्भाव.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

नागपूर जिल्ह्यात पावसाचा इशारा : गारपीट?

25 व 26 फेब्रुवारी या काळात अवकाळी पावसाची शक्यता आहे. विदर्भातील अकोला व बुलढाणा हे …

आचारसंहिता काय असते? ती नेमकी कधी अंमलात येते?

2024 लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. भाजपा असो काँग्रेस असो, इंडिया आघाडीतले घटक पक्ष …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *