नागपुरातील विद्यार्थ्यांना दिलासा, मेट्रो सुटेल ‘या’ वेळेत

नागपूर : शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेऊन महामेट्रोने सोमवार, १२ सप्टेंबरपासून सकाळी ६.१५ मेट्रोसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतलाय.

शेवटची मेट्रो रात्री १० वाजता सुटेल. मेट्रोच्या वर्धा मार्गासाठी कस्तुरचंद पार्क आणि खापरी तर हिंगणा मार्गासाठी बर्डी व लोकमान्य नगर अशा चारही स्थानकांवरून सोमवारपासून सकाळी ६.१५ पासून मेट्रोसेवेला सुरुवात होईल. रात्री १० पर्यंत मेट्रो धावेल. या दोन्ही मार्गांवर मेट्रोच्या फेऱ्यांमध्येही वाढ करण्यात आली आहे.

सध्या मेट्रोमधून शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या प्रमाणात प्रवास करतात. शाळेची वेळ सकाळी 7 वाजता असल्याने विद्यार्थ्यांची अडचण होते. त्यामुळे सकाळी सहापासून मेट्रोसेवा सुरू करावी अशी मागणी होती. सुधारित वेळापत्रकांमुळे नागपूरकरांना फायदा होणार आहे.

About विश्व भारत

Check Also

शेतीची मोजणी थांबली : भूमि अभिलेख कर्मचारी बेमुदत संपावर

विदर्भातील भूमि अभिलेख विभागातील कर्मचाऱ्यांनी २६ मेपासून तांत्रिक वेतन श्रेणी व अन्य प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत …

३५८ पदावर नौकरी लावून देण्यासाठी लाखोंचा व्यवहार : CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूक अधिसूचनेकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागले असतानाच बँकेतील ३५८ पदांच्या नोकरभरतीची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *