Breaking News

आमदार बंबविरोधात उद्या शिक्षकांचा मोर्चा

Advertisements

औरंगाबाद : खुलताबादचे भाजप आमदार प्रशांत बंब आणि शिक्षकांमधील संघर्ष दिवसेंदिवस वाढत आहे. मुख्यालयी उपस्थित राहत नाही, या शिक्षकांवरील आरोपानंतर बंब यांच्याविरोधात शिक्षकांसह पदवीधर, शिक्षक आमदार आक्रमक झालेत.औरंगाबादमधील आमखास मैदान ते विभागीय आयुक्त कार्यालायपर्यंत रविवारी (दि. ११) सकाळी 11 वाजता भव्य मोर्चा काढणार आहेत.

काय म्हणाले होते बंब

Advertisements

मुख्यालयी न राहता बहुतांश शिक्षक खोटी कागदपत्रे सादर करून घरभाडे घेतात. शासनाची फसवणूक करतात, असा आरोप गंगापूर-खुलताबादचे भाजप आमदार प्रशांत बंब यांनी पावसाळी अधिवेशनात केला होता. तेंव्हापासून बंब विरुद्ध शिक्षक असा संघर्ष सुरू आहे. तीन आठवडे झाले, तरी हा वाद मिटलेला नाही. आमदार बंब यांनी शिक्षकांची माफी मागावी, अशी शिक्षकांची मागणी आहे. मात्र, बंब आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.

Advertisements

पाच सप्टेंबरला शिक्षक दिनाच्या दिवशी आमदार बंब यांनी गांधीगिरी करत मुख्यालयी राहणाऱ्या शिक्षकांचा सत्कार व पूजन करत पुन्हा प्रत्यक्ष भेट देऊन शिक्षकांचे वास्तव समोर आणले. पिढी उध्वस्त करणाऱ्या शिक्षकांना शिक्षक व पदवीधर आमदार पाठीशी घालतात असा आरोप करत त्यांचे मतदारसंघच रद्द करा, अशी मागणी करत या आमदारांचा रोष ओढवून घेतला आहे. त्यामुळे शिक्षकांसह व पदवीधर व शिक्षक आमदार आक्रमक झाले आहेत.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

नागपूर हायकोर्टात पोहचला तलाठी भरती घोटाळा : राज्य शासनाला नोटीस

राज्यातील तलाठी भरतीत गैरप्रकार झाल्याचा आरोप करणाऱ्या याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने …

अपनी किशोर-युवावस्था की उम्र पार कर चुके महिला-पुरुषगणों कृपया अपने उज्जवल भविष्य की ओर देंगे ध्यान

अपनी किशोर-युवावस्था की उम्र पार कर चुके महिला-पुरुषगणों कृपया अपने उज्जवल भविष्य की ओर ध्यान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *