विश्व भारत ऑनलाईन :
श्रावणपासून उत्सवांची लगबग सुरु झालीय.गणपती, नवरात्र, दिवाळीपर्यंत रेल्वे प्रवाशांच्या संख्येत दुपटीने वाढ होते. त्यात यंदा पुणे, मुंबई मार्गावरील अनेक गाड्या रेल्वेच्या विविध कामासाठी रद्द करण्यात आल्या. यामुळे सध्या सुरु गाड्यांमध्ये पंधरा ते वीस दिवसांचे वेटिंग आहे. नवरात्र आणि दिवाळीसाठी प्रवाशांना महिनाभर तिकीट मिळत नसल्याचे दिसत आहे.प्रवाशांना प्रचंड अडचणीचा सामना करावा लागणार आहे.
जादा गाड्यांची मागणी
मध्य रेल्वे मंडळाच्या अनेक गाड्या दुरुस्तीच्या कामामुळे रद्द करण्यात आल्या आहेत. या गाड्या पूर्ववत करण्यात याव्या, अशी मागणी प्रवाशांकडून जोर धरत आहे. गाड्या बंद असल्यामुळे नोकरदार आणि विद्यार्थ्यांना त्रास होत आहे.यंदा कोरोनाच्या दोन वर्षानंतर नवरात्र आणि दिवाळी जल्लोषात साजरी होणार आहे. परिणामी आतापासून गाड्यांना वेटिंग आहे. मुंबई, पुणे, कोलकत्ता, सुरत मार्गावरील गाड्या प्रचंड फुल आहेत. त्यामुळे रेल्वे प्रशासनाकडून दिवाळी, नवरात्र उत्सव काळात विशेष गाड्या सोडण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.