Breaking News

राज्यात ‘मुख्यमंत्री किसान योजना’

विश्व भारत ऑनलाईन :
राज्यात ‘मुख्यमंत्री किसान योजना’ लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने घेतला आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर ही योजना असेल.

या योजनेअंतर्गंत प्रत्येक वर्षी राज्यातील शेतकऱ्यांना ६ हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. कृषी विभागाच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. येत्या अर्थसंकल्पात यासाठी तरतूद करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

मुख्यमंत्री किसान योजनेअंतर्गत प्रत्येक वर्षी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर ६ हजार अनुदान जमा करण्यात येणार आहे. टप्प्या टप्प्याने ही रक्कम खात्यावर जमा होईल.

या योजनेसाठी अर्थसंकल्पात किती रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे, याबाबतचा तपशील अद्याप समजू शकलेला नाही. तसेच या योजनेसाठी पात्र शेतकरी ठरविण्यासाठी कोणते निकष असतील,याबाबतही स्पष्टता नाही.

About विश्व भारत

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या जवळच्या आमदाराला राजकारण कळत नाही

महाराष्ट्र : मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे म्हणून ओळखले जाणारे विधान परिषद सदस्य परिणय फुके …

देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्रीपद धोक्यात : न्यायालयाकडून लवकरच निर्णय

भाजपचे देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे तीन वेळा मुख्यमंत्री राहिलेले भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत. त्यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *