विश्व भारत ऑनलाईन :
नागपूर जिल्ह्यातील सावनेर आणि नरखेड तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी आयसीआयसीआय लोंबार्ड कंपनीने योग्य शिक्षण नसलेल्या तरुणांची निवड केल्याची माहिती समोर आली आहे.
कंपनीने केलेल्या बोगस भरतीची चौकशी करावी, अशी मागणी निवेदनातून काही शेतकऱ्यांनी केली आहे. सन 2022-23 साठी पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी तालुका प्रतिनिधी नेमताना मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. त्यात पदवीधारक असणे आवश्यक आहे. मात्र, सर्व नियमांना डावलून शैक्षणिक अहर्ता पूर्ण न केलेल्या तरुणांची नियुक्ती कंपनीने केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. यासंदर्भात अखिल भारत हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रचारक मोहन कारेमोरे यांना काही शेतकऱ्यांनी पत्र पाठवून न्यायाची मागणी केली आहे.