Breaking News

आमदार, खासदार शिंदे गटात : ठाकरेंना धक्का, अब्दुल सत्तार यांचा दावा

विश्व भारत ऑनलाईन :

शिवसेनेतील आणखी काही आमदार आणि खासदार शिंदे गटात सहभागी होतील, असा दावा राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी परभणी येथील जाहीर सभेत केला.आणखी पाच आमदार आणि दोन ते तीन खासदार शिंदे गटात येणार आहेत, असं सत्तार यांनी म्हटलं आहे. सत्तारांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत.

कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे सध्या विदर्भ आणि मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. काल(शनिवार) ते परभणीत होते. यावेळी त्यांचा वाहन ताफा अडवण्याचा प्रयत्न शिवसैनिकांनी केला असता, सत्तार यांनी गाडीतून उतरून त्या शिवसैनिकांचं म्हणणं ऐकलं आणि त्यांचं निवेदनही स्वीकारलं. आता नेमका कोणता मुहूर्त आहे की, ठाकरे गटातील कोणते आमदार आणि खासदार शिंदे गटात येतात, हे बघावेच लागेल.

About विश्व भारत

Check Also

अखिल भारत हिंदू महासभा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात : 288 जागांवर देणार उमेदवार

✍️टेकचंद्र सनोडिया शास्त्री:सह-संपादक रिपोर्ट हिंदु संरक्षण आणि अखंड भारतासाठी अखिल भारत हिंदू महासभा महाराष्ट्र विधानसभा …

चंद्रशेखर बावनकुळे यांना मौदा-कामठीतून उमेदवारी घोषित : टेकचंद सावरकर यांना धक्का

कामठी-मौदा विधानसभा क्षेत्रातून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्यासह 99 उमेदवारांना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *