Breaking News

मुख्यमंत्री शिंदे-मुकेश अंबानी भेट… नेमकं कारण काय?

Advertisements

विश्व भारत ऑनलाईन :

Advertisements

राज्यातील महत्वाच्या प्रकल्पासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगपती मुकेश अंबानी यांची रात्री उशिरा भेट झाली असल्याची माहिती आहे. अंबानी यांनी शिंदे यांची वर्षा बंगल्यावर जाऊन भेट घेतली. दोघांमध्ये जवळपास दीड तास चर्चा झाली.

Advertisements

या भेटीवेळी मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी आणि शिंदे गटाचे नेते किरण पावस्कर हेही उपस्थित होते. भेटीनंतर रात्री १२.१५ वाजता अंबानी कुटुंबीय वर्षा बंगल्यावरून बाहेर पडताना दिसले.

दोन दिवसापूर्वी अदानीची भेट

दोन दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि अदानी उद्योग समुहाचे सर्वेसर्वा उद्योगपती गौतम अदानी यांची भेट झाली होती. महाविकास आघाडी सरकार काळात धारावी पुनर्विकासासाठी काही बैठका घेण्यात आल्या होत्या. या प्रकल्पासाठी अदानी उद्योग समूहाचे नाव चर्चेत होते. त्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याचे बोलले गेले होते.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

सानिया मिर्जा ने कहा, बेडपर जल्दी आउट हो जाता था शोएब मलिक

सानिया मिर्जा (Sania Mirza): भारतीय टेनिस पूर्व खिलाड़ी सानिया मिर्जा (Sania Mirza) इस समय सुर्खियों …

नागपुरच्या पारडी परिसरात रस्त्यावर पाणी, सर्वत्र अंधार

नागपुरातील पारडी परिसरात आज गुरुवारी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास काळोख पसरला. तसेच मुख्य रस्त्यावर सर्वत्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *