Breaking News

औरंगाबादला मिळाला २२ वर्षानंतर स्थानिक पालकमंत्री ; संदीपान भुमरेंकडे जबाबदारी

Advertisements

विश्व भारत ऑनलाईन :

Advertisements

राज्याचे रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांच्या रुपाने औरंगाबाद जिल्ह्याला गेल्या २२ वर्षात पहिल्यांदाच स्थानिक पालकमंत्री लाभले आहेत. याआधी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या, नंतर भाजप-शिवसेना युती सरकारच्या आणि महाविकास आघाडी सरकारच्या काळातही जिल्ह्याला जिल्ह्याबाहेरचे पालकमंत्री देण्यात आले होते.

Advertisements

राज्यात १९९५ ते १९९९ या काळात शिवसेना-भाजप युतीचे सरकार होते. त्यावेळी औरंगाबादच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी औरंगाबादचे स्थानिक आमदार चंद्रकांत खैरे यांच्याकडे सोपविण्यात आलेली होती. १९९९ साली राज्यात काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे सरकार आले. तेव्हापासून आतापर्यंत औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्रीपद सतत जिल्ह्याबाहेरच्याच व्यक्तीकडे राहिले. मागील २२ वर्षात पतंगराव कदम, बाळासाहेब थोरात, राधाकृष्ण विखे पाटील, रामदास कदम, डॉ. दीपक सावंत, सुभाष देसाई तसेच काही काळासाठी एकनाथ शिंदे यांच्याकडे पालकमंत्रीपदाची धुरा राहिलेली आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

दिलीप स्वामी छत्रपती संभाजीनगरचे नवे ‘कलेक्टर’

छत्रपती संभाजीनगरचे नवे जिल्हाधिकारी म्हणून दिलीप स्वामी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्याचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार …

एलोरा की गुफाएं एक आचंभित प्राचीन विश्व विरासत स्थल है!जरूर देखिए

एलोरा गुफाएं दुनिया में सबसरॉक-कट मठ मठ-मंदिर गुफाओं में से एक है। महाराष्ट्र के औरंगाबाद …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *