विश्व भारत ऑनलाईन :
शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची बातमी आहे. 7/12 उताऱ्यात मोठा बदल करण्यात आला आहे. आता प्रत्येक 7/12 उताऱ्याला वेगळा क्रमांक देण्यात आला आहे. तर, वरच्या बाजूला बारकोड असणार आहे.
फसवेगिरी थांबणार
यातून 7/12 उताऱ्यावर होणारी हेराफेरी, खाडाखोड, फसवेगिरी थांबणार आहे. शेतकऱ्यांना याचा लाभ होईल. तसेच एका शेतकऱ्याची नेमकी कुठे किती शेतजमीन आहे, याची माहिती याद्वारे मिळण्यास मदत होईल. येणाऱ्या काळात 7/12 उताऱ्यात आणखी बदल होण्याची अपेक्षा आहे.