Breaking News

नागपूर, औरंगाबाद, कोकणमध्ये शिक्षक ; तर नाशिक, अमरावतीत पदवीधर निवडणुकीची घोषणा

Advertisements

विश्व भारत ऑनलाईन :

Advertisements

नाशिक, अमरावती विभागात पदवीधर तसेच औरंगाबाद, नागपूर आणि कोकण मतदारसंघांतील शिक्षक मतदारसंघासाठीच्या निवडणुकीचा बिगुल सोमवारी वाजला. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी पत्रपरिषदेत यासंदर्भात माहिती दिली.
येत्या १ ते ७ नोव्हेंबरदरम्यान अर्ज करता येईल, प्रारूप यादी २३ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध होईल.

Advertisements

अर्ज उपलब्ध

निवडणुकांसाठी पात्र शिक्षक तसेच पदवीधरांनी प्रत्येक वेळी नव्याने नोंदणी करणे आवश्यक असते. पदवीधरसाठी १ नोव्हेंबर २०२२ पूर्वी किमान ३ वर्षे आधी कोणत्याही शाखेतून पदवी प्राप्त केलेले नागरिक मतदार नोंदणीसाठी पात्र आहेत १ नोव्हेंबर २०२२ रोजीच्या लगतच्या सहा वर्षांतील तीन वर्षे शिक्षक म्हणून माध्यमिक शाळेपेक्षा कमी दर्जा नसलेल्या संस्थेत कार्यरत असलेले शिक्षक मतदार नोंदणीसाठी पात्र आहेत. या मतदारसंघासाठी अर्ज क्र. १९ भरून मतदार नोंदणी करू शकतात. दोन्ही मतदारसंघांसाठीचे अर्ज संबंधित विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसील कार्यालयात तसेच मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या https://ceo.maharashtra.gov.in/Downloads/DownloadForms/Form-18.pdf आणि Form-19.pdf या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

निवडणूक कार्यक्रम

-१ ते ७ नोव्हेंबर : मतदार नोंदणीसाठी अर्ज.
-२३ नोव्हेंबर : प्रारूप मतदार यादी.
-२३ नोव्हेंबर ते ९ डिसेंबर : दावे व हरकती घेण्याचा कालावधी.
-२५ डिसेंबर : दावे व हरकती निकालात काढले जातील.
-३० डिसेंबर : अंतिम मतदार यादी जाहीर होईल.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

जिल्हाधिकाऱ्यांचे छायाचित्र वापरून नागरिकांकडे पैशांची मागणी

जिल्हाधिकारी अजित कुंभार यांचे छायाचित्र वापरून ‘व्हॉट्स ॲप’वर आरोपीने बनावट खाते उघडले. या खात्यावरून नागरिकांकडे …

वर्तमान में ढाई अरब रुपए की चल व अचल संपत्ति के मालिक हैं नवीन जिंदल : किरण खेर?

वर्तमान में ढाई अरब रुपए की चल व अचल संपत्ति के मालिक हैं नवीन जिंदल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *