विश्व भारत ऑनलाईन :
सर्वोच्च न्यायालयामध्ये घटनापीठापुढे होणाऱ्या सुनावण्याचं थेट प्रक्षेपण आजपासून म्हणजेच २७ सप्टेंबरपासून केलं जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात एका महिन्यापूर्वी नोटीस जारी करुन न्यायालयाच्या कामकाजासंदर्भातील खंडपीठाला याबद्दलचे निर्देश दिले होते. त्यानुसार आजपासून घटनापीठापुढील सुनावणीचं थेट प्रक्षेपण केलं जाणार आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील शिंदे विरुद्ध ठाकरे हा सत्तासंघर्ष, आमदार अपात्रता आणि खरी शिवसेना कोणाची, या मुद्द्यांवरील सुनावणीपासून या थेट प्रक्षेपणाला सुरुवात होणार आहे.
सर्वोच्च न्यायालयातील हे थेट प्रक्षेपण राष्ट्रीय माहिती केंद्र म्हणजेच नॅशनल इनफॉर्मेटीक्स सेंटरच्या (एनआयसीच्या) माध्यमातून वेबकास्ट केलं जाणार आहे. ही सुनावणी सर्वोच्च न्यायालयाच्या प्लॅटफॉर्मवर म्हणजेच वेबकास्ट डॉट जीओव्ही डॉट इन (webcast.gov.in) वर दिसणार आहे.
विश्वभारत News Website