Breaking News

टेन्शन वाढलंय! वर्षभरात 15 एलपीजी सिलिंडर मिळतील… वाचा

Advertisements

विश्व भारत ऑनलाईन :

Advertisements

आता घरगुती एलपीजी ग्राहकांना नवीन नियमानुसार एका कनेक्शनवर वर्षभरात फक्त 15 सिलिंडर मिळतील. तसेच कोणताही ग्राहक एका महिन्यात दोनपेक्षा जास्त सिलिंडर घेऊ शकणार नाही. तिन्ही तेल कंपन्यांकडून ग्राहकांसाठी हा निर्णय लागू करण्यात आला आहे.

Advertisements

आतापर्यंत घरगुती विनाअनुदानित कनेक्शन असलेल्या ग्राहकांना हवे तेवढे सिलिंडर मिळत होते. तथापि, नव्या नियमानुसार, घरगुती एलपीजी ग्राहकांना वर्षभरात 15 सिलिंडरच मिळणार आहेत. घरगुती एलपीजी सिलिंडरवर घालण्यात आलेल्या मर्यादेबाबत वितरकांनी दिलेल्या माहितीनुसार, सिलिंडरसंदर्भातील रेशनिंगसाठीच्या सॉफ्टवेअरमध्ये बदल करण्यात आले आहेत. तसेच याची तातडीने कार्यवाही करण्यात आली आहे.

अनेकदा व्यावसायिक वापरासाठी अनुदानित घरगुती गॅस सिलिंडरचा वापर केला जातो. यासंदर्भातील अनेक तक्रारी वारंवार समोर येत असल्यामुळे घरगुती एलपीजी सिलिंडरच्या संख्येवर मर्यादा आणण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समोर आले आहे. अनुदानित घरगुती गॅस सिलिंडरसाठी नोंदणी केलेल्यांना त्या दराने वर्षभरात केवळ 15 सिलिंडर मिळणार आहेत. यापेक्षा जास्त सिलिंडरची गरज भासल्यास ग्राहकांना अनुदान नसलेले सिलिंडर घ्यावे लागेल. एखाद्या ग्राहकाला गॅसची जास्त किंमत मोजावी लागत असेल, तर त्याचा पुरावा देऊन त्याला तेल कंपनीच्या अधिकार्‍यांची परवानगी घ्यावी लागेल. त्यानंतरच संबंधित ग्राहकाला अतिरिक्त रीफिल मिळू शकेल, असे सांगण्यात आले आहे.

About विश्व भारत

Check Also

जरांगेचा सरकारवर दबाव : हायकोर्टात याचिका

राज्य मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष निवृत्त हायकोर्टाचे न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांच्यासह आयोगाच्या इतर सदस्यांच्या नियुक्तीला जनहित …

लोकसभा चुनाव कब होंगे? चीफ इलेक्शन कमिश्नर राजीव कुमार ने दिया बड़ा अपडेट

2024 लोकसभा चुनाव को लेकर चुनाव आयोग से तैयारियां पूरी कर ली हैं। मुख्य चुनाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *