Breaking News

मृत्यूचा सापळा : 44 वन्यप्राणी ठार.. वाचा सविस्तर

Advertisements

 

विश्व भारत ऑनलाईन :
नागपूर जिल्ह्यातील पेंच ते खवासा हा राष्ट्रीय महामार्ग ४४ वन्यप्राण्यांसाठी मृत्यूचा सापळा ठरला आहे. काही दिवसांपूर्वीच या महामार्गावर महाराष्ट्राच्या बाजूने भरधाव वाहनाच्या धडकेत एका बिबटय़ाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता पुन्हा मध्यप्रदेशातील खवासा सीमेजवळ वाहनाच्या धडकेत मादी बिबट मृत्युमुखी पडला आहे. हा परिसर ‘ग्रीन कॉरिडॉर’ म्हणून ओळखला जात असून वन्यजीवांच्या सुरक्षित हालचालीसाठी तो बांधण्यात आला आहे. मात्र, त्यानंतरही या महामार्गावर मृत्यू होत असल्याने त्यावर प्रश्नचिन्ह उभे झाले आहे.

Advertisements

महाराष्ट्रातील तसेच मध्यप्रदेशातील पेंच व्याघ्रप्रकल्पालगतचा हा राष्ट्रीय महामार्ग ४४ आहे. या महामार्गाच्या दोन्ही कडेला घनदाट जंगल असल्याने भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनांखाली वन्यप्राण्यांचे मृत्यू थांबवण्यासाठी उपशमन योजना करण्यात आल्या. या उपशमन योजनांवर सुमारे ६०० ते ७०० कोटी रुपये खर्च करण्यात आले. मात्र, त्यानंतरही वन्यप्राण्यांचे अपघाती मृत्यू सुरूच आहेत. जुन्याच पुलांना नवीन दाखवणे, नवीन बांधण्यात आलेल्या पुलाखाली कायम पाणी साचून राहणे या प्रकारांमुळे उपशमन योजनांच्या गांभीर्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. नागपूर ते सिवनी महामार्गावर मनसरपासून रस्त्याच्या दोन्ही कडेला जंगल आहे.

Advertisements

या महामार्गाचे चौपदरीकरण करण्यासाठी येथील वृक्षसंपदेवर कुऱ्हाड चालवण्यात आली. याविरोधात वन्यजीवप्रेमींनी न्यायालयात धाव घेतली आणि तब्बल एक दशक या महामार्गाचे चौपदरीकरण रखडले. उपशमन योजनांच्या आश्वासनानंतरच चौपदरीकरणाला सुरुवात झाली. मध्यप्रदेशातील पेंच व्याघ्रप्रकल्पापासून जाणाऱ्या ८.७ किलोमीटर रस्त्याच्या रुंदीकरणामुळे वन्यजीवांना अधिक धोका होता. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या भागात १३ उड्डाणपूल बांधून देण्याचे मान्य केले. ते बांधल्यानंतरही सातत्याने अपघात सुरूच आहेत. डेहरादून येथील भारतीय वन्यजीव संस्थेला उपशमन योजनांच्या अभ्यासाचे काम देण्यात आले होते. मात्र, भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनांखाली येऊन वन्यप्राण्यांचे होणारे मृत्यू पाहता या उपशमन योजनांसाठीचा अभ्यास गांभिर्याने झाला का, याबाबत आता शंका व्यक्त केली जात आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस : दुष्काळाचे सावट

देशात सर्वच भागात सप्टेंबर महिन्यात पडेल. मात्र, तो एकसारखा राहणार नाही. सरासरी 91 ते 109 …

गोंदियात 3 बिबट्यांची शिकार

वीज प्रवाह सोडून तीन बिबट्यांची शिकार करण्यात आल्याची घटना गोंदिया जिल्ह्यातील देवरी-आमगाव मार्गावरील बिसेन यांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *