Breaking News

अतिक्रमण – वनविभागाचा दबाव ? : शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

विश्व भारत ऑनलाईन :
गोंडपिपरी तालुक्यातील गोजोली येथील 60 वर्षीय शेतकऱ्याने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांना उपचारासाठी चंद्रपूरच्या जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शेतकरी गंभीर आहे.गोजोली येथील गणपती सोनूने हे वनविभागाच्या जागेवर १९८४ पासून शेती करित आहेत. सोनूने यांच्यासोबत अनेकांनी वनजमिनीचे पटटे मिळविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज केला आहे.

सोनूने कुटुंबियांच्या सांगण्यावरून शनिवारी (ता. १) वनअधिकारी व वनकर्मचारी वारंवार अतिक्रमण काढण्यासंदर्भात शेतकऱ्यांवर दबाव टाकत होते, अशी माहिती मिळाली आहे.

वनकर्मचाऱ्यांनी उभे पीक असलेल्या शेतात येऊन अतिक्रमण काढण्यासाठी बजावले. यावेळी या कर्मचाऱ्यांनी पिकाचेही नुकसान केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. याचाच धसका घेत आज रविवारी सकाळच्या सुमारास गणपती सोनुने यांनी कीटकनाशक प्राशन केले. कुटुंबीयांना माहिती होतात त्यांनी गणपतीला रूग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर झाल्याने पुढील उपचारासाठी त्यांना चंद्रपूरच्या जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले.

About विश्व भारत

Check Also

चंद्रपूर जिल्ह्यात सेवा देण्याऱ्या IPS अधिकाऱ्याचा अपघातात मृत्यू

IPS दर्जाचे वरिष्ठ पोलीस अधिकारी डॉ .सुधाकर पठारे यांचा तेलंगणामध्ये रस्ते अपघातात मृत्यू झाला. ते …

१५ प्रवासी…भरधाव ट्रॅव्हल व ट्रकची समोरासमोर भीषण धडक

प्रवासी वाहतुक करणाऱ्या ट्रॅव्हल्स व हायवा ट्रकमध्ये समोरासमोर झालेल्या धडकेत २ जण गंभीर जखमी तर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *