Breaking News

धनगर समाजाचा वैचारिक शत्रू कोण? गोपीचंद पडळकरांची जहरी टीका

Advertisements

विश्व भारत ऑनलाईन :
धनगर समाजाचे खरे वैचारिक शत्रू हे बारामतीचे शदचंद्रजी पवार आहेत,अशी जहरी टीका करत आमदार गोपीचंद पडळकर यांनी दसऱ्या मेळाव्यात तूफान फटकेबाजी केली. यामध्ये धनगर समाजाच्या आरक्षणापासून ते आरेवाडी देशाची राजधानी झाली पाहिजे, असे विविध मुद्दे मांडत आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार यांच्यावर भाषणादरम्यान जोरदार टीका केली.

Advertisements

दरम्यान पवारांनी कधी अहिल्यादेवीची जयंती केली आहे का ? आणि पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार हार घालत फिरत आहेत,याआधी कधी फिरलेत का ? असा सवाल पडळकर यांनी उपस्थित केला.

Advertisements

राजकारणामध्ये धनगर समाजाने पुढे आलं पाहिजे. बोललं पाहिजे तुम्ही शांत राहून चालणार नाही, मी वाटलं तर खाली बसतो दुसरं कुणी तरी बोला. पण सगळ्यांनी एकजूट करा असेही पडळकर म्हणाले.

पवार नावाच्या जातीनं आपलं रक्त शोषण करून पिल आहे. या राज्यात सर्वात जास्त मराठा जातीचे नुकसान करणारं कोण असेल तर शरद पवार आहे असेही टीका यावेळी पडळकर यांनी केली.

आरेवाडी प्रेरणास्थान होऊ शकते म्हणून त्यांनी खोडा दसरा मेळाव्याला घातला होता.पवारांचं सरकार सत्तेवर होतं त्यावेळी ओबीसीची फाईल जाग्यावरून हलली नाही. मात्र आपलं सरकार सत्तेवर आल्यावर 72 हजार ओबीसी वसतीगृह मंजूर केले.

आरेवाडी मध्ये राष्ट्रीय कुस्ती केंद्र उभे करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. आरेवाडी ट्रस्टला मी सांगू इच्छितो की, आरेवाडी ट्रस्टला लागेल तेवढी मदत देण्याचे काम मी करत आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

(भाग:175)ध्यान योग के द्धारा हम कठिन से कठिन अप्राप्त वस्तुओं को भी प्राप्त कर सकते है

भाग:175)ध्यान योग के द्धारा हम कठिन से कठिन अप्राप्त वस्तुओं को भी प्राप्त कर सकते …

नागपुरात देशात रेकॉर्ड निर्माण करणारा रोजगार मेळावा

नागपूर : नमो महारोजगार मेळाव्यामध्ये दाखल झालेल्या एकूण मुलाखत दिलेल्या तरुणांपैकी ११ हजार ०९७ तरुणांना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *