विश्व भारत ऑनलाईन :
धनुष्यबाण कुणाचा, शिंदे की ठाकरे यावर आजच फैसला अपेक्षित आहे. केंद्रीय निवडणूक आयोग साधारणपणे दोन गोष्टींचा प्रामुख्याने विचार करते. एक म्हणजे इलेक्टीव्ह विंग, ज्याला लेजिसलेटीव्ह म्हणतात. म्हणजेच राजकीय पक्ष स्वरुपात आणि दुसरी ऑर्गनायझेशनल विंग म्हणजेच संघटनात्मक स्वरुप. आता इलेक्टीव्ह विंगसंदर्भात विचार करताना आमदार, खासदार कोणाच्या बाजूने आहेत हे महत्तवाचं ठरतं. तर ऑर्गनायझेशनल विंगमध्ये संघटनेचे पदाधिकारी कोणाच्या बाजूने आहेत, यासंदर्भातील पुरावा प्रतिज्ञापत्रावर दिला जातो. अर्थात यासंदर्भात कोणाचं बळ किती आहे हे तपासून निवडणूक आयोग यासंदर्भातील निर्णय घेईल,” असं निकम यांनी म्हटलं आहे. म्हणजेच निकम यांनी या प्रतिज्ञापत्रांचा संदर्भ निकाल देताना ग्राह्य धरला जाईल असे संकेत दिले आहेत.

आमदार, खासदारांची संख्या ठरविणार धनुष्यबाण कुणाचे? शिंदेंचं पारडं जड?
Advertisements
Advertisements
Advertisements