Breaking News

शाळकरी मुलांसारखी केली बैठकीतून हकालपट्टी : विभागीय आयुक्तांविषयी नाराजी

Advertisements

विश्व भारत ऑनलाईन :
जे काही करायचे ते रीतसर कागदोपत्री करा, मात्र शाळकरी मुलांसारखी वागणूक आम्हाला नका देऊ, अशी विनंती काही अधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याकडे केली.

Advertisements

घनकचरा व्यवस्थापन आणि वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट यासंदर्भात विभाग प्रमुखांची आढावा बैठक मंगळवारी केंद्रेकर यांनी औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली.

Advertisements

यात उद्दिष्ट गाठण्यात दिरंगाई केली म्हणून नगर परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी हाकलले. याबद्दल अधिकारी वर्तुळात नाराजीचा सूर व्यक्त होत आहे. घनकचरा, वृक्ष लागवडीविषयी अधिकाऱ्यांना समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत. त्यामुळे संतापलेल्या केंद्रेकरांनी या अधिकाऱ्यांना सभागृहाबाहेर जाण्यास सांगितले. यामुळे अधिकाऱ्यांच्या वर्तुळात तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे. कारणे दाखवा नोटीस बजावून नियमानुसार कारवाई करणे शक्य असताना आम्हाला शाळकरी मुलांसारखी अपमानास्पद वागणूक का, अशी भावना अनेकांनी नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर व्यक्त केली.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

जिल्हाधिकारी डॉ. इटनकर कुणावर करणार कारवाई : नागपुरात मतदान कमी होण्यासाठी जबाबदार कोण?

लोकसभा निवडणुकीत मतदार यादीत नावे नसल्याने नागपुरातील लाखो मतदार मतदानापासून वंचित राहिल्याबद्दल सार्वत्रिक ओरड होत …

हे काय सुरु आहे?नागपुरातील मतदानात तफावत

नागपूर लोकसभेसाठी शुक्रवारी मतदान झाल्यानंतर शनिवारी अधिकृत आकडेवारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून प्रसिद्ध करण्यात आली. तसेच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *