विश्व भारत ऑनलाईन :
जिल्हा परिषदांमधील १३ हजार ५१४ पदांची भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना धक्का बसला आहे. उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जातील तपशीलामध्ये अनेक त्रुटी आढळून आलेल्या आहेत. त्यामुळे ही भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.
ग्रामविकास विभागाकडून १८ सवर्गांच्या गट क च्या १३ हजार ५१४ पदांसाठी मार्च २०१९ मध्ये जाहिरात प्रसिद्ध केली होती. मात्र, अनेक अडचणीमुळे ही भरती प्रक्रिया वारंवार लांबणीवर पडत चालली होती. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका, कोरोना महामारी, आरक्षणाचा प्रश्न आदी कारणांमुळे ही भरती प्रक्रिया रेंगाळली होती. आता ही भरती प्रक्रिया रद्द केल्याचे ग्रामविकास खात्याने जाहीर केले. वेगवेगळ्या पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना परीक्षा शुल्क परत देण्यात येणार आहे.