नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यातील चिखली गावाजवळ वनविभागाने सव्वा लाख किमतीचे सागवान लाकूड जप्त केले.
चिखली गावानजीक वनविभागाच्या कंपार्टमेंटमध्ये मौल्यवान सागाच्या झाडांची कत्तल करुन ते गुजरात राज्यात विक्री करण्याची तयारी असल्याचे कळते.तसेच यासंदर्भात वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती वनविभाग प्रादेशिकच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना मिळाली. त्यानुसार पथकाने बुधवार दि.(२३) रोजी मध्यरात्री सापळा रचला.
सव्वा लाखाचा माल जप्त
सागवान झाडांची कत्तल करुन ठेवलेले सागचे चौपाट केलेले पंधरा नग १.९४२ घन. मीटर सुमारे १,२५,००० रूपये किमतीचे लाकूड जागेवर बेवारस स्थितीत आढळून आले. ते ताब्यात घेेेेत पेठ येथे आणण्यात आले. वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी पुढील तपास करीत आहेत. उपवनसंरक्षक पंकज गर्ग, सहाय्यक वनसंरक्षक अनिल पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी अरुण सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली भुवन परिमंडळ अधिकारी तानाजी भोये, वनरक्षक धनराज वाघमारे, हरिदास मिसाळ, जितेंद्र गायकवाड, किरण दळवी, मजहर शेख, रोजंदारीवरील वनमजुर आदींनी यशस्वी कामगिरी केली.